Salary in lakhs for ‘these’ jobs in India : मेहनतीची अंतिम पायरी म्हणजे मिळणारे समाधान होय. आपल्या समाजात तरी यशाचे मोजमाप पगारावर केले जाते. हाच विचार करुन आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वाधिक पगार देण्याच्या नोकऱ्यांबद्दल सांगत आहोत. विकसित देशांच्या तुलनेत भारत ही उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहे. परंतु गेल्या काही वर्षांत आरोग्यसेवा, बहुराष्ट्रीय कंपन्या, वाहन, बँकिंग, दूरसंचार यासारख्या क्षेत्रांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीत वाढ झाली आहे. भारतात दरमहा सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्या कोणत्या आहेत? त्याची यादी पाहूयात…
Highest Salaried job in India : सरकारी अधिकारी
सरकारी अधिकारी (वर्ग I/गट अ) मध्ये रुजू होणाऱ्या उमेदवारांचा पगार 56 हजार 100 ते 2 लाख 50 हजारांपर्यंत असतो. मात्र Ip पदावर काम करण्यासाठी, UPSC CSE, NDA, CDSE, GATE सारख्या परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात.
हे वाचा: अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण का येते? जाणून घ्या..
Highest Salaried job in India : डॉक्टर
भारतातील डॉक्टरांची (तज्ञ/ चिकित्सक/ सर्जन) सरासरी मासिक कमाई 80 हजार ते 1 लाख 70 हजार असते. मात्र यासाठी 10+2 पीसीबी; एमबीबीएस आणि एमडीचा भला मोठा अभ्यास करावा लागतो.
Highest Salaried job in India ; व्यावसायिक पायलट
व्यावसायिक पायलटचा मासिक पगार 1 ते 1.5 लाखांपर्यंत असतो. ही नोकरी मिळवण्यासाठी 10+2 PCM. 200 तास उड्डाण आणि 40 तास सिम्युलेटर प्रशिक्षण घ्यावे लागते.
Highest Salaried job in India ; मर्चंट नेव्ही ऑफिसर
मर्चंट नेव्ही ऑफिसरचा पगार महिन्याला 1.5 ते 2.5 लाखांपर्यंत असतो. ही नोकरी मिळवण्यासाठी 10+2 PCM, B.SC. नैसर्गिक विज्ञान किंवा BE/B.Tech Marine Engg. IMU CET परीक्षा द्यावी लागते. भारतीय नौदल भारती 2023 साठी नेव्ही बी.टेक कॅडेट कोर्स एझिमाला केरळ येथे होणार आहे.
हे वाचा: Why Is the Most American Fruit So Hard to Buy?
Highest Salaried job in India ; डेटा सायंटिस्ट
डेटा सायंटिस्ट/एआय/एमएल एक्स्पर्टचा मासिक पगार 80 हजार ते 1.5 लाखांपर्यंत असतो. गणित आणि संगणक विज्ञानासह कोणत्याही स्ट्रीममधून 10+2 पास असणे आवश्यक आहे. याशिवाय, पीजी/एआय/एमएल/डेटा सायन्समध्ये प्रमाणपत्र देखील लागेल.
Highest Salaried job in India ; इन्व्हेस्टमेंट बँकर
इन्व्हेस्टमेंट बँकरचा पगार दरमहा 90 हजार ते 2 लाखांपर्यंत असतो. ही नोकरी मिळविण्यासाठी, गणित खाते अर्थशास्त्रासह कोणत्याही स्ट्रीममधून 10+2 करा पास असणे आवश्यक आहे. याशिवाय एमबीए फायनान्स/फायनान्शियल मॅनेजमेंट/फायनान्स आणि अकाउंटिंग/सीएफए सर्टिफिकेट करावे लागेल.
Highest Salaried job in India ; बिझनेस अॅनालिस्ट
बिझनेस अॅनालिस्टचा दरमहा पगार 70 हजार ते 1 लाखांपर्यंत असतो. या क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी गणित/ सांख्यिकी/ अर्थशास्त्र/ संगणक विज्ञान सह कोणत्याही स्ट्रीममधून 10+2 पास आवश्यक आहे. तसेच बिझनेस अॅनालिटिक्स/डेटा अॅनालिटिक्समधील पीजी/ सर्टिफिकेशनचा अभ्यास करावा लागेल.
हे वाचा: Chief Ministers of Indian States : कोणत्या राज्याचे कोण मुख्यमंत्री?
Highest Salaried job in India ; कॉर्पोरेट वकिल
कॉर्पोरेट वकिलाचा पगार अंदाजे 75 हजार ते 2 लाखांपर्यंत असतो. ही नोकरी मिळवण्यासाठी, कोणत्याही स्ट्रीममधून 10+2 शिक्षण आवश्यक आहे. कॉर्पोरेट लॉमध्ये 10+2 स्पेशलायझेशनसह 5 वर्षांत बीए एलएलबी किंवा 3 वर्षांत एलएलबी आवश्यक आहे. मात्र यासठी बीसीआयचा परवानाही घ्यावा लागेल.