Gautami Patil : अहमदनगरच्या पोलीस ठाण्यात गौतमी पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतमी पाटील सोबत अन्य 5 जणांवर देखील पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Gautami Patil : नेमकं प्रकरण काय?
परवानगी नाकारली असताना देखील नृत्यांगना गाैतमी पाटील हिने अहमदनगरमध्ये नृत्याचा कार्यक्रम सादर केल्याप्रकरणी तिच्यासह आयाेजकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
हे वाचा: Ahmednagar Gram Panchayat Election 2023 : अहमदनगरमधील 194 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर
हेही वाचा : Most Controversial Bollywood Actors : बॉलीवूड मधील सर्वात वादग्रस्त Actors कोणते?
गणेश विसर्जनाच्या दिवशी, पाेलिसांनी परवानगी नाकारली असताना देखील विनापरवानगी कार्यक्रम भरस्त्यात सादर केला. वाहतुकीला अडथळा निर्माण केला. ध्वनीप्रदूषण केले, अशा विविध मुद्यांवरून हा ताेफखाना पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिस कर्मचारी तन्वीर सलीम शेख यांनी फिर्याद दिली आहे.
हे वाचा: Gold Silver Rate Today : सोनं झालं स्वस्त? काय आहे आजचे सोन्या-चांदीचे भाव? पाहा.
Gautami Patil : ‘या’ पाच जणांवर गुन्हा दाखल
नृत्यांगना गाैतमी पाटील (रा. पुणे), तिचा स्वीय सहायक अशाेक खरात (रा. पुणे), मृत्युंजय प्रतिष्ठान आणि एकदंत मित्र मंडळाचा संस्थापक राहुल सांगळे, मृत्युंजय मंडळाचे अध्यक्ष आनंद कैलास नाकाडे, एकदंत मित्र मंडळाचा अध्यक्ष हर्षल किशाेर भागवत या पाच जणांविरुद्ध गुन्हा नाेंदवला आहे.
अहमदनगरमधील सावेडीच्या उपनगरात नृत्यांगना गाैतमी पाटील हिचा कार्यक्रम गणेश विसर्जनाच्या दिवशी आयाेजित केला हाेता. या कार्यक्रमाला ताेफखाना पाेलिसांनी परवानगी नाकारली हाेती. तरी देखील कार्यक्रम झाला.
हे वाचा: टीम इंडिया क्रिकेट वर्ल्ड कपसाठी रेडी - Cricket World Cup 2023 - Team India