Chaturmas : चालू वर्षी (2023) लग्न तिथी कमी असल्या, तरी चिंता करण्याचे कारण नाही. कारण यंदा अधिकमास-चातुर्मास काळातही लग्न करता येणार आहे. त्यासाठी दिवाळीनंतर तुळशीच्या विवाहाची वाट पाहण्याची आशक्यता नाही. एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान आपत्कालीन जवळपास 37 लग्न तिथी पंचांग कर्त्यांनी दिले आहेत. मग, काय उडू द्या लग्नाचा बार…
मुख्य काळातील लग्न तिथी –
मे : 2, 3, 4, 7, 9, 10,11, 12, 15, 16, 21, 22, 29, 30.
जून : 1, 3, 7, 8, 11, 12, 13, 14, 26, 27, 28.
डिसेंबर : 6, 7, 15, 17, 20, 21, 25, 26, 31.
हे वाचा: 2 मार्च 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…
गौणकाल आणि आपत्कालीन मुहूर्त –
एप्रिल : 15, 23, 24, 29, 30.
जून : 30,
जुलै : 1, 2, 4, 5, 9, 10, 11, 14.
ऑगस्ट : 22, 26, 28, 29
सप्टेंबर : 3, 6, 7, 8, 17, 24, 26.
ऑक्टोबर : 16, 20, 22, 23, 24, 26.
नोव्हेंबर : 1, 6, 16, 18, 20, 22.
अधिकमास : 18 जुलै ते 16 ऑगस्ट
चातुर्मास : 29 जून ते 23 नोव्हेंबर
आपत्कालीन विवाह मुहूर्त कोणासाठी? : विशेषतः चातुर्मासात आपत्कालीन व मुहूर्त देण्यात आले आहेत. ज्यांचे आधीच लग्न ठरले आहे किंवा साखरपुडा झाला आहे, घरात कोणी ज्येष्ठ व्यक्ती आजारी आहे, त्यांच्या डोळ्यासमोर लग्न लावायचे आहे किंवा कोणाची नोकरी विदेशात आहे. त्यांना दिवाळीनंतर सुट्टया मिळत नाहीत. अशांनी आपत्कालात विवाह करावा, तसेच मुख्य काळात मंगल कार्यालय उपलब्ध झाले नाही; काही अडचणी आली, तरी आपत्कालात विवाह करावा.
हे वाचा: Buying land? 'Ya' entries on Satbara : जमीन खरेदी करताय? सातबाऱ्यावरील 'या' नोंदी नक्की वाचा अन्यथा…