भंगार विका, पैसे मिळवा.
अश्या प्रकारच्या मोहिमा आपण अनेकदा पाहतो.
गौरी गणपती सण आलाय नंतर दिवाळी दसरा आहेच.
प्रत्येक घरात साफसफाई मोहीम सुरु होते. आपण जुन्या नको असलेल्या गोष्टी काढून फेकून देतो किंवा भंगारात देतो.
हे वाचा: Mission Karmayogi Yojana : सरकारी नोकरदारांसाठी भारत सरकारची मिशन कर्मयोगी योजना आहे तरी काय?
Central Got – केंद्र सरकारसुद्धा अशी मोहीम येत्या ऑक्टोबर महिन्यात राबवणार आहे. यंदा 3.0 ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. सरकारतर्फे सातत्याने स्वच्छता मोहीम राबवायला सुरुवात झालेली आहे. गेली दोन वर्षे अशी स्वच्छता मोहीम राबवणे सुरु आहे.
स्वच्छता मोहिमेचा उद्देश
अश्या मोहिमांची कार्यालयांची स्वच्छता पण होते आणि नकोश्या असलेल्या गोष्टी पण निकाली निघतात.
जुनी नकोशी असलेली कागदपत्रे, कालबाह्य झालेली उपकरणे, वस्तू साठवण करून जागेची अडचण वाढवण्यापेक्षा त्या निकाली काढणे जास्त सोयीचे.
चांद्रयान ३ मोहिमेला झालेल्या खर्चापेक्षा जास्त रक्कम भंगार, रद्दी विकून केंद्र शासनाने मिळवली आहे. सरकारी कार्यालयातील बिनकामाच्या फाइल्स, खराब झालेली उपकरणे, वाहने भंगारात विकण्यात आली. यातून तब्बल 600 कोटी रुपयांची कमाई झाली.
हे वाचा: Atal Pension Yojana : अटल पेन्शन योजना नेमकी काय आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती.
ही आकडेवारी फक्त ऑगस्ट पर्यंतची असून ऑक्टोबरपर्यंत हा आकडा 1 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
ह्या सगळ्यातून पेंडिंग कामाची संख्या पण कमी होत जाते. गेल्या वर्षीही ऑक्टोबर महिन्यात अशीच मोहिम शासनाने राबवली होती. यातून सुमारे 371 कोटी रुपये कमावले होते. तर यावेळी तिसऱ्या टप्प्यात 400 कोटी रुपयांच्या महसुलाचे ध्येय आहे.
दोन वर्षांपूर्वी मोहिमेला सुरुवात झाल्यापासून 31 लाख सरकारी फाइल्सचा नकोस असलेला ढीग हटवण्यात आला आहे. आजवर सरकारी कार्यालयातील जवळपास ३०० लाख स्क्वेअरफूट जागा रिकामी झाली आहे.
हे वाचा: G20 Summit : G20 परिषद
केंद्राचा हा उपक्रम नक्कीच चांगला आहे. वातावरण स्वच्छ राहते, रेकॉर्ड मॅनेजमेंट नीट होते. मोकळी जागा वापरण्यास सोयीचे होते.