AHD Maharashtra Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या कौशल्यवान तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती होणार आहे. काही दिवसांपूर्वी या भरती बाबतची जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे. पण अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख 11 जूनपर्यंतच होती. त्यामुळे इच्छा असूनही काही अनेकांना अर्ज भरता आले नव्हते. काही कारणास्तव ज्या तरुणांना या भरतीसाठी अर्ज दाखल करता आला नव्हता आशा तरुणांना महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने आणखी एक संधी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने या भरती प्रक्रियेत अर्ज दाखल करण्यासाठी आणखी काही दिवस मुदत वाढ दिली आहे. ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. त्यात अर्ज कसा आणि कुठे करायचा? अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता काय आहे. यांची सविस्तर माहिती दिलेली आहे.
AHD Maharashtra Recruitment : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामध्ये जवळपास चारशेहून अधिक विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. या बाबतची जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने या आधीच प्रसिद्ध केली होती. पण आता भरतीला मुदतवाढ देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदांनुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे. त्यामुळे अनेक कौशल्यवान तरुणांना सरकारी नोकरी करून भविष्य घडविण्याची एक उत्तम संधी आहे. पण या भरतीमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. भरती बाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे…
हे वाचा: IB Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु; असा करा अर्ज
भरती बाबतची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे….
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामध्ये विविध पदांच्या जवळपास 446 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत (AHD Maharashtra Recruitment 2023). महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागागाने जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठं करायचा? पात्रता काय? याबातची सर्व माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
AHD Maharashtra Recruitment : पदाचे नाव आणि पदसंख्या
पद क्रमांक |
पदाचे नाव |
शैक्षणिक पात्रता | पदसंख्या |
1 | पशुधन पर्यवेक्षक | 1) 10वी उत्तीर्ण हे वाचा: Bank Job 2023 : महाराष्ट्रातील 'या' बँकेमध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? 2) पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा कृषी पदवी किंवा समतुल्य. |
376 |
2 | वरिष्ठ लिपिक | पदवीधर | 44 |
3 | लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क) | 1) 10वी उत्तीर्ण
2) लघुलेखन 120 श.प्र.मि. 3) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
02 |
4 | लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क) | 1) 10वी उत्तीर्ण हे वाचा: CPCB Recruitment 2023 : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात भरती सुरु; असा करा अर्ज 2) लघुलेखन 100 श.प्र.मि. 3) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
13 |
5 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क) | 1) रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र विषयांसह विज्ञान पदवी
3) प्रयोगशाळा वैद्यकीय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा |
04 |
6 | तारतंत्री (गट-क) | 1) ITI (तारतंत्री)
2) 01 वर्ष अनुभव |
03 |
7 | यांत्रिकी (गट-क) | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (डिझेल मेकॅनिक) (iii) 02 वर्षे अनुभव | 02 |
8 | बाष्पक परिचर (गट-क) | 1) 10वी उत्तीर्ण
2) बाष्पक आणि धुराचा उपद्रव संस्थेचे द्वितीय श्रेणीचे प्रमाणपत्र |
02 |
एकूण जागा : 446 |
वयोमर्यादा :
महाराष्ट्र शासनाच्या या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 01 मे 2023 पर्यंत सरासरी 18 ते 38 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तर SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट असणार आहे. तरीही वयाच्या संपूर्ण माहितीसाठी कृपया एकदा जाहिरात पहा.
नोकरी ठिकाण : महाराष्ट्रात कुठेही
शुल्क :
खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये शुल्क असणार आहे तर राखीव प्रवर्गासाठी तसेच माजी सैनिकांसाठी 900 रुपये शुल्क असणार आहे.
AHD Maharashtra Recruitment : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पहा
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज – येथे Click करा.
AHD Maharashtra Recruitment : महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वरील भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 16 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यानंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे अर्ज वेळेआधीच भरले तर फायद्याचं ठरणार आहे. तसेच या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा कधी होणार आहे याबाबतची तारीख महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून नंतर कळविण्यात येणार आहे.
तुम्हाला या भरती बाबतची अधिक आणि सविस्तर माहिती पाहिजे असल्यास तुम्ही वर दिलेली जाहिरात पाहू शकता.