Career opportunities in insurance sector : भारतातील विमा क्षेत्र आताशा चांगलंच वाढायला लागलं आहे. ह्यात विविध भूमिका आणि कार्यांमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. सरकारी विमा कंपन्यांसोबतच खाजगी विमा कंपन्याही जोरात व्यवसाय करत आहेत. भारतातील विमा क्षेत्रातील काही लोकप्रिय करिअर संधी इथं मांडत आहोत.
सेल्स आणि मार्केटिंग : विमा कंपन्यांना ग्राहकांना विमा उत्पादनांचा प्रचार म्हणजे पब्लिसिटी आणि विक्री करण्यासाठी सेल्स आणि मार्केटिंग व्यावसायिकांची आवश्यकता असते. हे एक क्षेत्र आहे ज्यात अनेक लोकं सध्या काम करत आहेत. इन्शुरन्स विकता येणे ही आताशा थोडी कठीण पण अत्यावश्यक बाब बनली आहे.
हे वाचा: business : 1 लाख रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय, लग्नाच्या हंगामात बंपर कमाई फिक्स
एक्चुरियल सायन्स: ऍक्च्युअरी जोखीम (Risk) आणि अनिश्चिततेच्या (Uncertainty) आर्थिक परिणामांचे विश्लेषण (Analysis) आणि मूल्यांकन (Valuation) करतात. भविष्यातील अनिश्चित घटनांचा अभ्यास करण्यासाठी ते गणित, सांख्यिकी आणि आर्थिक सिद्धांत वापरतात, विशेषत: विमा आणि पेन्शन कार्यक्रमांशी संबंधित. विमा हा अनेक गोष्टींवर आधारित असल्याने सातत्याने अभ्यास आणि भविष्याकडे वेध घेऊन मांडणी करण्याची गरज असते.
अंडररायटिंग: अंडररायटर ह्या प्रकारच्या कामात संभाव्य ग्राहकांच्या जोखमींचे मूल्यांकन केले जाते आणि विमा प्रकारानुसार इन्शुरन्स पॉलिसींच्या अटी आणि शर्ती निर्धारित केल्या जातात. अत्यंत काळजीपूर्वक आणि कायदेशीर असा अभ्यास करून ह्या क्षेत्रातले काम सुरु असते कारण त्यावर कंपनीच्या दाव्यांमद्ये पारदर्शकता निर्माण होते.
दावे व्यवस्थापन (Claim Management): पॉलिसीधारकांनी केलेले दावे हाताळण्याची यंत्रणा म्हणजे क्लेम मॅनेजमेंट. दाखल झालेले क्लेम्समी त्यांची कागदपत्रे, त्यांची चौकशी आणि अंतिम प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणेत वकील, डॉक्टर आणि समायोजक यांसारख्या इतर अनेक पक्षांशी समन्वय साधण्याचे काम ते सातत्याने करत असतात. दावा ऐकली निघावा आणि त्यात न्याय व्हावा ह्यासाठी प्रयत्न करणारी यंत्रणा ह्या विभागातले लोकं राबवत असतात.
हे वाचा: Happy Birthday Railway : झुकझुक झुकझुक आगगाडीचा आज 170वा वाढदिवस.
जोखीम व्यवस्थापन (Risk Management): जोखीम व्यवस्थापक म्हणजे रिस्क मॅनेजर हा संभाव्य जोखीम ओळखतात आणि त्यांचे मूल्यांकन करतात. भविष्यातील जोखीम कमी करण्यासाठी धोरणे विकसित करण्याचे महत्वाचे काम ह्या विभागात केले जाते.
ऑपरेशन्स: हा विभाग काटेकोरपणे काम करतो. पॉलिसी इश्यू करताना अनेक बाबी समजावून सांगून तसेच तपासून मगच पॉलिसी इश्यू केली जाते. ऑपरेशन विभागात व्यावसायिक पॉलिसी जारी करणे, प्रीमियम संकलन आणि ग्राहक सेवेसह विमा कंपन्यांच्या दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करतात.
माहिती तंत्रज्ञान: आयटी व्यावसायिक विमा कंपन्यांद्वारे वापरल्या जाणार्या तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि सॉफ्टवेअर ह्या संदर्भात सातत्याने काम करत असतात.
हे वाचा: Rashi Bhavishya : 24 मार्च 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…
भारतातील विमा क्षेत्रात एखाद्याला करिअर करण्यासाठी वर उल्लेखलेल्या गोष्टींसोबतच अनेक गोष्टी असणे आवश्यक आहे. उत्तम संभाषण कौशल्ये, विषय मांडणी हातोटी, कॉमर्स क्षेत्रातील शिक्षण त्याचसोबत इन्शुरन्स, एक्च्युरिअल सायन्स किंवा रिस्क मॅनेजमेंट मधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी यांसारख्या संबंधित अभ्यासक्रमांची निवड करू शकते. याव्यतिरिक्त, इंटर्नशिप किंवा एंट्री-लेव्हल नोकऱ्यांद्वारे अनुभव मिळवून या क्षेत्रात करियर घडण्यास मदत होऊ शकते.