आधार कार्डवर फसवणूक होऊच शकत नाही, नवीन सेफ्टी फिचर लॉंच
गेल्या अनेक वर्षांपासून आधार कार्ड अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. याच कारणास्तव भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वेळोवेळी अनेक प्रकारची सुरक्षा फिचर जारी करते. ज्यामुळे फसवणुकीची प्रकरणे कमी होतील. याच अनुषंगाने आता UIDAI ने आणखी एक सुरक्षा यंत्रणा तयार केली आहे. याबद्दल माहिती देताना UIDAI ने सांगितले की, आधार ऑथेंटिकेशनसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर आधारित एक नवीन सिक्योरिटी सिस्टम तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये ‘फिंगर मिनुटिया’ आणि ‘फिंगर इमेज’ सारख्या टूल्सद्वारे आधार कार्ड वापरणारी व्यक्ती योग्य आहे की नाही? हे चेक करता येईल. यामुळे आधार ऑथेंटिकेशन आणखी मजबूत करण्यात मदत होईल.
हे वाचा: Good Day To Take A Photo With Your Favorite Style
दुहेरी सुरक्षा : UIDAI ने निवेदनात म्हटले आहे की, या सुरक्षा फिचरद्वारे आधारशी संबंधित व्यवहार अधिक सुरक्षित करण्यात मदत होईल. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन फिंगरप्रिंटद्वारे, आधार वापरणाऱ्या व्यक्तीच्या लाईव्हनेसविषयी माहिती कळेल. यामुळे सायबर फसवणूक करणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.
नवीन फीचर कुठे वापरले जाईल? : UIDAI ने निवेदनात म्हटले आहे की, हे नवीन फीचर बँकिंग आणि फायनेंशियल, टेलीकॉम आणि सरकारी विभागांसाठी वापरले जाईल. यामुळे आधारशी जोडलेली पेमेंट सिस्टम मजबूत होण्यासही मदत होईल. या फीचरच्या माध्यमातून देशाच्या लोकसंख्येच्या शेवटच्या भागापर्यंत विविध फायदे मिळतील. हे आधार बेस्ड फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन चालू झाले आहे. आता ते सहजपणे वापरले जाऊ शकते.
विविध कारणांच्या निमित्ताने देशात आधारचा वापर सातत्याने वाढतच चालला आहे. विशेष म्हणजे, देशभरात आधार-लिंक ऑथेंटिकेशन वापरणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. यामध्ये अनेक लोक त्याचा उपयोग सरकारी योजनांसाठी करतात. एका आकडेवारीनुसार, डिसेंबर 2022 पर्यंत, बेस ऑथेंटिकेशन ट्रान्झॅक्शनने 880 कोटींचा टप्पा ओलांडला होता. दररोज सरासरी 70 दशलक्ष व्यवहार केले जातात.
हे वाचा: 5g network in your phone: तुमच्या फोनमध्ये अजूनही 5Gनेटवर्क नाही? एक छोटी सेटिंग्ज करा आणि...