Friday , 17 May 2024
Home घडामोडी Ahmednagar Gram Panchayat Election 2023 : अहमदनगरमधील 194 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर
घडामोडी

Ahmednagar Gram Panchayat Election 2023 : अहमदनगरमधील 194 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

Ahmednagar Gram Panchayat Election 2023
Ahmednagar Gram Panchayat Election 2023

Ahmednagar Gram Panchayat Election 2023 : राज्यातील गावागावात निवडणुकीचा गुलाल उडणार आहे. कारण राज्य निवडणूक आयाेगाने मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच 2 हजार 950 सदस्य पदाच्या आणि 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

Ahmednagar Gram Panchayat Election 2023
Ahmednagar Gram Panchayat Election 2023

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतीच्या (Ahmednagar Gram Panchayat Election 2023) निवडणुका होणार आहे.

हे वाचा: List of gold medal winners for India at the 19th Asian Games : 19व्या आशियाई खेळांमध्ये कोणकोणत्या खेळात भारताला सुवर्ण पदक मिळाले?

Ahmednagar Gram Panchayat Election 2023 : कोणकोणत्या तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका होणार? 

अकाेले 24, संगमनेर 7, काेपरगाव 17, राहाता 12, श्रीरामपूर 17, राहुरी 22, नेवासे 16, नगर तालुका 7, पारनेर 8, पाथर्डी 16, शेवगाव 27, कर्जत 6, जामखेड 3 आणि श्रीगाेंद्यातील 10 ग्रामपंचायतींसाठी मतदान हाेईल.

Ahmednagar Gram Panchayat Election 2023 : या ग्रामपंचायतींच्या निवडणूक होणार

नगर तालुका –

बारदरी, मेहेकरी, हिवरेझरे, अरणगाव, देऊळगाव सिध्दी, हिंगणगाव, वडगाव गुप्ता.

हे वाचा: Sangharshyodhha Manoj Jarange Patil : 'संघर्षयोद्धा'

अकाेले

कोभाळणे, पैठण, जहागिदरावाडी, बारी, साम्रद, रतनवाडी, मुतखेल, शिसवद, पाचनई, अंबित, पेंडशेत, वांजुळशेत, रेडे, सुगाव बुद्रुक, गर्दणी, कौठवाडी, पिंपळगाव नाकविंदा, आंबेवंगण, देवगाव, एकदरे, तिरडे, कोकणवाडी, पाचपट्टावाडी, घोटी, पेढेवाडी, पिंपळदरावाडी, खानापूर-आगार.

संगमनेर –

हे वाचा: Caste Based Survey : शासकीय सेवेत जातीनिहाय सर्वेक्षण हाेणार...?

गुंजाळवाडी, ढोलेवाडी, आश्वी खुद्रुक, आश्वी बुद्रुक, बोरबन, घारगाव, पिंपळगाव कोझीरा.

हेही वाचा : Bank Holidays In October 2023 : ऑक्टोबर महिन्यात 15 दिवस बँका असणार बंद

काेपरगाव –

कुंभारी, घोयेगाव, ब्राम्हणगाव, वारी, जवळके, धोत्रे, बोलकी, सुरेगाव, लौकी, मुर्शतपूर, चांदगव्हाण, दहेगाव बोलका, कारवाडी, पोहेगाव, शहजापूर, मंजुर, कान्हेगाव.

Ahmednagar Gram Panchayat Election 2023
Ahmednagar Gram Panchayat Election 2023

राहाता –

दहेगाव को-हाळे, को-हाळे, निमगाव को-हाळे, धनगरवाडी, दुर्गापूर, वाकडी, दाढ बुद्रुक, पिंपरीनिर्मळ, कनकुरी, रुई, पुणतांबा-रस्‍तापूर, चितळी.

श्रीरामपूर –

उंदिरगाव, शिरसगाव, उक्‍कलगाव, निमगाव खैरी, भोकर, फत्‍याबाद, खिर्डी, कान्‍हेगाव, गुजरवाडी, माळवड्गाव, दत्‍तनगर, भैरवनाथनगर, जाफराबाद, नाऊर, दिघी, रामपूर, कडित बुद्रुक.

राहुरी –

कानडगाव, चिंचोली, पिंप्री वळण, निंभेरे, सडे, डिग्रस, शिलेगाव, दरडगाव थडी, मोमिन आखााडा, घोरपडवाडी, धामोरी बुद्रुक, धामोरी खुद्रुक, म्‍हैसगाव, देसवंडी, तमनर आखाडा, गंगापूर, बारागाव नांदूर, ब्राम्‍हणी, माहेगाव, मालुंजे खुद्रुक, मुसळवाडी, टाकळी मिया.

नेवासे –

करजगांव, पानेगांव, देडगांव, पाचेगांव, फत्तेपुर, रस्तापूर, कौठा, शहापुर, पिचडगांव, भानसहिवरा, खुणेगांव, नागापूर, जैनपुर, सौंदाळा, पानसवाडी, मुकिंदपूर.

शेवगाव –

हिंगणगावन-ने, देवटाकळी, शहरटाकळी, बालमटाकळी, ढोरसडे अंत्रे, मुंगी, क-हेटाकळी, खरडगाव, थाटे, बोधेगाव, वडुले खुद्रुक, वरुर बुद्रुक, भगुर, लोळेगाव, सामनगाव, एरंडगाव भागवत, लाखेफळ, एरंडगाव समसूद, वडुले बुद्रुक, खडके, मडके, लाडजळगाव, आव्‍हाणे बुद्रुक, ब-हाणपूर, दिवटे, शेकटे खुद्रुक, गोळेगाव.

पाथर्डी –

ढवळेवाडी, सैदापूर, हत्राळ, डमाळवाडी, जवखेडे खालसा, कासारवाडी, धारवाडी, गितेवाडी, पाडळी, दगडवाडी, डांगेवाडी, साकेगाव, रेणुकाईवाडी, डोंगरवाडी, चिचोंडी, करंजी.

Ahmednagar Gram Panchayat Election 2023
Ahmednagar Gram Panchayat Election 2023

जामखेड –

मुंजेवाडी, मतेवाडी, जवळा.

कर्जत –

कुंभेफळ, वायसेवाडी, खेड, गणेशवाडी, औटेवाडी, करमणवाडी.

श्रीगाेंदे –

विसापूर, अधोरेवाडी, पेडगाव, आनंदवाडी, कोळगाव, देवदैठण, मढेवडगाव, टाकळी लोणार, लोणी व्‍यंकनाथ, घुटेवाडी.

पारनेर –

विरोली, यादववाडी, मावळेवाडी, काकनेवाडी, वाडेगव्हाण, कान्‍हुरपठार, जामगांव, निंबोडी.

अहमदनगर जिल्ह्यात 194 ग्रामपंचायतींसाठी 5 नाेव्हेंबर 2023 रोजी मतदान हाेईल, तर 6 नाेव्हेंबरला मतमाेजणी हाेईल. निवडणुकीसाठी 16 ते 20 ऑक्टोबरला उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील, तर अर्ज 25 ऑक्टाेबरला मागं घेता येणार आहेत.







Subscribe Now

    Subscribe to our mailing list to receives daily updates direct to your inbox!