India squad Announced for T-20 series : बीसीसीआयने वेस्ट इंडिज (India vs West indies) सोबतच्या पाच T-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची काल उशिरा घोषणा केली आहे. यात संघामध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. तसेच काही नव्या चेहऱ्यांना देखील संघामध्ये जागा देण्यात आली आहे. यासोबतच आगामी आशिया कप आणि वर्ल्ड कपचा विचार करता संघाच्या महत्वाच्या सिनियर खेळाडूंना आराम देण्यात आला आहे.
India squad Announced for T-20 series : हार्दिक पांड्याकडे नेतृत्वाची जवाबदारी :
रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये भारतचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याकडे कर्णधार पदाची जवाबदारी देण्यात आली आहे. तसेच मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव याला उपकर्णधारपदाची जवाबदारी देण्यात आली आहे.
India squad Announced for T-20 series : सिनिअर खेळाडूंना विश्रांती :
आगामी आशिया कप आणि वर्ल्ड कपचा विचार करता संघाच्या महत्वाच्या सिनियर खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. यामध्ये कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.
नव्या चेहऱ्यांना संधी तर काहींना डावलले :
देशांतर्गत स्पर्धांमध्ये आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या काही युवा खेळाडूंना या T-20 (India vs West indies) संघात स्थान देण्यात आले आहे. यामध्ये तिलक वर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांचा समावेश आहे. तर आयपीएलमध्ये दमदार खेळी करणारा विदर्भाचा युवा खेळाडू जितेश शर्मा आणि सलग 5 षटकार ठोकणारा मॅच विनर खेळाडू रिंकू सिंह यांना मात्र सांध्यात स्थान देण्यात आले नाही. यासोबतच ऋतुराज गायकवाड आणि शार्दूल ठाकूर यांच्याही नावाचा विचार या मालिकेसाठी करण्यात आला नाही.
हे वाचा: ICC Cricket World Cup Facts : ICC क्रिकेट वर्ल्ड कपबद्दल काही रंजक गोष्टी.
या खेळाडूंचं पुनरागमन :
वेस्ट इंडिज सोबतच्या T-20 मालिकेसाठी (India vs West indies) काही खेळाडूंचं पुनरागमन करण्यात आलं आहे. यामध्ये संजू सॅमसन, रवी बिष्णोई आणि अर्शदीप सिंह यांच्या नावाचा समावेश आहे. तर कसा आहे भारतीय संघ? पाहा…
India squad Announced for T-20 series : भारतीय संघ –
Alert🚨: #TeamIndia's squad for T20I series against the West Indies announced. https://t.co/AGs92S3tcz
हे वाचा: ICC World Cup Rivalries : यंदाच्या वर्ड कपमधील काही हाय व्होल्टेज सामने.
— BCCI (@BCCI) July 5, 2023
इशान किशन (WC) , शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (VC), संजू सॅमसन (WC), हार्दिक पांड्या (C), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार
हेही वाचा : आर्थिक नियोजनात पडणारे साधे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
India squad Announced for T-20 series : T-20 सामन्याचे वेळापत्रक
- पहिला सामना : 3 ऑगस्ट 2023 (ब्रायन लारा क्रिकेट अॅकेडमी, त्रिनिदाद)
- दुसरा सामना : 6 ऑगस्ट 2023 (नॅशनल स्टेडिअम, गयाना)
- तिसरा सामना : 8 ऑगस्ट 2023 (नॅशनल स्टेडिअम, गयाना)
- चौथा सामना : 12 ऑगस्ट 2023 (सेन्ट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम, फ्लोरिडा)
- पाचवा सामना : 13 ऑगस्ट 2023 (सेन्ट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम, फ्लोरिडा )
सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8 वाजता सुरु होतील.