ICC World Cup 2023 Schedule : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने (ICC) भारतात होणाऱ्या आयसीसी वर्ल्डकप 2023 चं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आज मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात वर्ल्डकप 2023 चं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. हा वर्ल्डकप 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधी दरम्यान होणार आहे. यंदाही या स्पर्धेमध्ये 10 संघ एकमेकांशी भिडणार आहेत.
ICC World Cup 2023 Schedule : कसे होणार सामने?
यंदा या स्पर्धेमध्ये 10 संघ एकमेकांशी भिडणार आहेत. त्यात प्रत्येक संघ हा 9 सामने खेळणार असून लीग स्टेजमध्ये एकूण 45 सामने खेवण्यात येणार आहेत. त्यातील 6 सामने सकाळी साडेदहा वाजता सुरु होतील बाकीचे सर्व सामने दुपारी 2 वाजता सुरु होणार आहेत. सँर्धेतील टॉप 4 संघ सेमीफाइनलसाठी पात्र ठरतील. त्यातील 2 विजेते संघ वर्ल्डकप 2023 वर आपलं नाव कोरण्यासाठी एकमेकांशी भिडतील.
हे वाचा: Morocco Earthquake - मोरोक्कोमध्ये भूकंप
सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी टॉप फायनान्स टिप्स; जाणून घ्या
ICC World Cup 2023 Schedule : इंग्लंड-न्यूझीलंड यांच्या सामन्याने होणार श्रीगणेशा :
यंदाच्या वर्ल्ड कपची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून होणार आहे. पहिलाच सामना गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
ICC World Cup 2023 Schedule : 12 मैदानावर रंगणार सामने :
भारतात होणाऱ्या या वर्ल्डकपचे सर्व सामने हे देशातील 12 मैदानावर खेळवले जाणार आहेत. यात अहमदाबाद, दिल्ली, बेंगलोर, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, धर्मशाला, लखनऊ, पुणे, त्रिवेन्द्रम आणि गुवाहटी या शहरातील मैदानांचा समावेश आहे. तसेच सेमीफाइनलचे 2 सामने कोलकत्ता आणि मुंबईच्या मैदानावरती खेळवले जाणार आहेत तर अंतिम सामना अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे.
हे वाचा: Gold Silver Rate Today : सोनं झालं स्वस्त? काय आहे आजचे सोन्या-चांदीचे भाव? पाहा.
ICC World Cup 2023 Schedule : महाराष्ट्रात 10 सामने होणार
वर्ल्डकपचे 10 सामने हे महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. यामध्ये पुण्यात 4 तर मुंबईमध्ये 4 साखळी फेरीतील सामने व एक सेमीफाइनलचा सामना होणार आहे.
ICC World Cup 2023 Schedule : स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक :
GET YOUR CALENDARS READY! 🗓️🏆
The ICC Men's @cricketworldcup 2023 schedule is out now ⬇️#CWC23https://t.co/j62Erj3d2c
हे वाचा: Central Govt - Scrap selling : भंगार विका, पैसे मिळवा.
— ICC (@ICC) June 27, 2023
ICC World Cup 2023 Schedule : वर्ल्डकपमधील भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक :
भारताची पहिली लढत 8 ऑक्टोबर 2023 रोजी ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहेत तर 15 ऑक्टोबर 2023 ला भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. हा सामना अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
ICC World Cup 2023 Schedule : भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक :
8 ऑक्टोबर – भारत vs ऑस्ट्रेलिया (चेन्नई)
11 ऑक्टोबर – भारत vs अफगाणिस्तान (दिल्ली)
15 ऑक्टोबर – भारत vs पाकिस्तान (अहमदाबाद)
19 ऑक्टोबर – भारत vs बांगलादेश (पुणे)
22 ऑक्टोबर – भारत vs न्यूझीलंड (धर्मशाला)
29 ऑक्टोबर – भारत vs इंग्लंड (लखनौ)
2 नोव्हेंबर – भारत vs क्वॉलीफायर 2 (मुंबई)
5 नोव्हेंबर – भारत vs दक्षिण आफ्रिका (कोलकाता)
11 नोव्हेंबर – भारत vs क्वॉलीफायर 1 (बेंगलोर)