Wednesday , 17 July 2024
Home government schemes Startup India Seed Fund Scheme : स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना – सरकारचा 1 झकास उपक्रम.
government schemes

Startup India Seed Fund Scheme : स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना – सरकारचा 1 झकास उपक्रम.

Startup India Seed Fund Scheme
Startup India Seed Fund Scheme : Letstalk

Startup India Seed Fund Scheme : स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना (SISFS) हा सरकार-समर्थित उपक्रम आहे जो भारतातील स्टार्टअप्सना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरु झालेला आहे. 2016 मध्ये सुरु झालेली ही योजना स्टार्टअप इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आली होती. भारतात स्टार्टअप्सच्या भरभराटीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे ह्या उद्देशाने ह्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Startup India Seed Fund Scheme
Startup India Seed Fund Scheme : Letstalk

Startup India Seed Fund Scheme : स्टार्टअप्ससाठी नवी संजीवनी

SISFS हा उपक्रम (Startup India Seed Fund Scheme) स्टार्टअप्सना अनुदान आणि कर्जाच्या स्वरूपात निधी पुरवते. अनुदानाचा वापर स्टार्टअपना त्यांच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रोटोटाइप विकासासाठी तसेच बेसिक गोष्टी करण्यासाठी केला जातो. काही स्टार्टअप्स कर्जाचा वापर विकासाच्या नंतरच्या टप्प्यात मार्केट एंट्री आणि व्यावसायीकरणासाठी केला जातो.

हे वाचा: National Digital Health Mission : 'नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन' नेमकं काय आहे? जाणून घ्या याबाबतची संपूर्ण माहिती

SISFS भारतातील सर्व स्टार्टअप्ससाठी खुलं आहे. स्टार्टअप्सच्या कॅटेगरी कोणतीही असो त्यांना काही पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे नंतर त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येतो.

SISFS हा भारतीय स्टार्टअप इकोसिस्टमसाठी महत्त्वाचा उपक्रम बनला आहे. या योजनेमुळे भारतातील स्टार्टअप्स आणि उद्योजकतेबाबत जागरुकता वाढविण्यातही मदत झाली आहे.

Startup India Seed Fund Scheme : SISFS चे काही फायदे :

आर्थिक सहाय्य :

हे वाचा: CIDCO Scheme Home Loan : सिडकोच्या स्कीममधील घरांसाठी मिळणार आता होम लोन.

SISFS स्टार्टअप्सना अनुदान आणि कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य प्रदान करते. हे स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यातील वाढीच्या आव्हानांवर मात करण्यास मदत करू शकते. उत्पादन किंवा सेवा विकसित करणे ह्यासाठी साहाय्य मिळते.

हेही वाचा : CIBIL आणि Credit स्कोअर म्हणजे काय? जाणून घ्या. 

मार्गदर्शन :

हे वाचा: Shabri Gharkul Yojana : शबरी आदिवासी घरकुल योजना.

SISFS नव्या स्टार्टअप्सना अनुभवी उद्योजक आणि व्यावसायिकांकडून मिळवण्यास मदत करते. स्टार्टअप्सना व्यवसाय धोरण (Business Strategy), विपणन (Marketing) आणि निधी उभारणी (Investment) यांसारख्या विविध विषयांवर सल्ला आणि मार्गदर्शन मिळते.

नेटवर्किंगच्या संधी :

SISFS स्टार्टअप्सना इतर स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि सरकारी अधिकाऱ्यांसोबत नेटवर्किंगच्या संधी देखील प्रदान करते. स्टार्टअप्सना एक बिझनेस रिलेशन तयार करण्यात मदत करते.

SISFS हे आजकाल भारतातील स्टार्टअप्ससाठी एक मौल्यवान असं रिसोर्स सेंटर आहे. आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन आणि नेटवर्किंग ह्यामुळे स्टार्टअप्सना यशस्वी होण्यासाठी मदत होते.

तुम्ही जर स्टार्टअप करत असाल तर SISFS साठी अर्ज करण्याचा विचार करावा. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेला आधार ही योजना तुम्हाला देऊ शकते. अर्थात व्यवसाय करताना सर्वसमावेशक, विचारपूर्वक, स्कीम्स, लोन ह्या सगळ्याचा नीट विचार करून मगच निर्णय घ्यावा.Subscribe Now

  Subscribe to our mailing list to receives daily updates direct to your inbox!

  Related Articles

  Chief Minister Aid Fund
  government schemes

  Chief Minister Aid Fund : उपचारासाठी पैशांची गरज भासतेय? कॉल करा आणि मिळवा गंभीर आजारांसाठी 2 लाखांपर्यंत अर्थसाहाय्य

  Chief Minister Aid Fund : मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय उपचारांसाठी मिळणारे अर्थसाहाय्य ह्यासाठी एक...

  PM Vishwakarma Yojana
  government schemes

  PM Vishwakarma Yojana : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना

  PM Vishwakarma Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी केंद्र सरकारने विश्वकर्मा योजना लाँच...

  FreeGasConnection
  government schemes

  Free Gas Connection : मोफत गॅस कनेक्शन – उज्ज्वला 2.0 योजना

  Free Gas Connection : आता गॅस कनेक्शन पण मिळणार मोफत. उज्ज्वला 2.0...

  Central Govt Action Plan
  government schemesघडामोडी

  Central Govt – Scrap selling : भंगार विका, पैसे मिळवा.

  भंगार विका, पैसे मिळवा. अश्या प्रकारच्या मोहिमा आपण अनेकदा पाहतो. गौरी गणपती...