World Malaria Day : मलेरिया हा एक जीवघेणा रोग आहे. एनाफिलीस डासांच्या मादीच्या चाव्याव्दारे लोकांमध्ये पसरतो. मलेरिया ही एक प्रमुख सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. विशेषत: उप-सहारा आफ्रिकेत, आशिया, लॅटिन अमेरिका आणि जगाच्या इतर भागांमध्ये देखील मलेरिया ही मोठी आरोग्य समस्या आहे. मलेरियाच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी आणि फ्लू सारखी लक्षणे यांचा समावेश होतो आणि त्यावर उपचार न केल्यास गंभीर अशी गुंतागुंत होऊन मृत्यू देखील होऊ शकतो.
हे वाचा: A comprehensive guide to the best summer dresses
जागतिक मलेरिया दिन हा मलेरियाचे नियंत्रण, प्रतिबंध आणि शेवटी निर्मूलन करण्याच्या जागतिक प्रयत्नांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 25 एप्रिल रोजी पाळला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 2007 पासून जागतिक मलेरिया दिवस पाळायला सुरुवात केली. मलेरिया संपवण्यासाठी गुंतवणूक आणि राजकीय इच्छेची गरज ह्या दोन गोष्टी अपेक्षित आहेत. मानवाला प्राणघातक आजारांपासून वाचवण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन मलेरियाविरुद्ध लढणे आवश्यक आहे.