World Heritage Day : जागतिक वारसा दिवस 18 एप्रिल रोजी जगभर साजरा केला जातो. ह्या दिवसाची स्थापना 1982 मध्ये इंटरनॅशनल कौन्सिल ऑन मोन्युमेंट्स अँड साइट्स (ICOMOS) द्वारे करण्यात आली होती आणि 1983 मध्ये UNESCO च्या जनरल असेंब्लीने मान्यता दिली होती. तेंव्हापासून दरवर्षी उत्साहाने जगभरातल्या वारसा म्हणून जपल्या गेलेल्या स्थळांचा उत्सव साजरा करणे सुरु झाले.
जागतिक वारसा दिनाचा उद्देश जगभरातील सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन आणि संरक्षण हा आहे. यामध्ये इमारती, स्मारके, लँडस्केप आणि इतर प्रकारच्या सांस्कृतिक वारशाचा समावेश आहे. मानवाच्या उत्क्रांतीमध्ये तसेच मानवाचा भविष्य वेधण्याचा प्रक्रियेत ज्या गोष्टी उत्कृष्ट समजल्या जातात त्यांना वारसा मानले गेले आहे.
हे वाचा: The Supreme Court Has a Perfectly Good Option in Most Divisive
दरवर्षी, सांस्कृतिक वारशाच्या एका विशिष्ट पैलूवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जागतिक वारसा दिनासाठी एक वेगळी थीम निवडली जाते.
प्रदर्शन, कार्यशाळा, व्याख्याने आणि हेरिटेज स्थळांच्या मार्गदर्शनपर सहली अशा विविध उपक्रमांद्वारे जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. लोकांना जगभरातील सांस्कृतिक वारशाबद्दल अधिक जाणून घेण्याची आणि भविष्यातील पिढ्यांसाठी या खजिन्याचे जतन करण्याची ही एक संधी आहे.
आपल्या आसपास असणाऱ्या सांस्कृतिक सामाजिक भौगोलिक वारशांची माहिती ह्या निमित्ताने आपण करून घेतली पाहिजे. सुट्टीच्या काळात मुलांना अश्या ठिकाणी नेले पाहिजे. इतिहासाची दखल घेऊन मगच भविष्याकडे वाटचाल करणे आवश्यक असते.