Thursday , 16 January 2025
Home घडामोडी Sangharshyodhha Manoj Jarange Patil : ‘संघर्षयोद्धा’
घडामोडी

Sangharshyodhha Manoj Jarange Patil : ‘संघर्षयोद्धा’

LetsTalk
Sangharshyodha_LetsTalk

Sangharshyodhha Manoj Jarange Patil : ‘संघर्षयोद्धा’

मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्रात आता सर्वपरिचित झालेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ह्यासाठी ते उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा १६वा दिवस आहे. उपोषण सुटण्याची चिन्हे काही दिसत नाहीयेत.

पण एक नवीन बातमी समोर आली आहे, ती म्हणजे मनोज जरांगे ह्यांच्यावर सिनेमा तयार होतो आहे. आणि हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘संघर्षयोद्धा’ (Sangharshayoddha) असे या सिनेमाचे नाव आहे. काल अंतरवाली सराटी येथे संघर्षयोद्धा सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण झाले आहे.

हे वाचा: State Cabinet Meeting Decision : आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत लोकाभिमुख निर्णय.

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्याकरिता उभारलेल्या लढ्याला सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘संघर्षयोद्धा’ हा सिनेमा करण्यात येणार आहे असे निर्मात्याने सांगितले. सिनेमाचे चित्रीकरण येत्या डिसेंबर महिन्यात सुरू होईल आणि मार्च 2024 पर्यंत हा सिनेमा रिलीज करण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले आहे.

अभिनेता रोहन पाटील हा मनोज जरांगे (Manoj Jarange) ह्यांची भूमिका करणार आहे तर दिग्दर्शनाची धुरा शिवाजी दोलताडे सांभाळतील. ह्या सिनेमाच्या शूटिंगची सुरुवात सराटी या गावातून करून मनोज जरांगेच्या जन्मगावासह मुंबईतही या सिनेमाचं शूटिंग होणार आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी हा सिनेमा पूर्ण करून तो रिलीज करण्यासाठी प्रयत्न असणार आहे, असे दोलताडे ह्यांनी सांगितले.

हे वाचा: Update on Diesel Vehicle - डिझेल गाड्या आता महागणार