iPhone15 – नवीन आयफोन आला आयफोन आला आयफोन आला
काल iphone15 लाँच झाला. जगभर सातत्याने चर्चेत असलेला फोन.
स्टेट्स सिम्बॉल असणारा फोन. महागडा असणारा फोन.
नवीन iphone15 आला एकदाचा. जागतिक मार्केटमध्ये त्याचा काल लाँच होता.
आपण थोडक्यात नव्या iphone15 चे फीचर्स पाहुयात.
– आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस हे मॉडेल पाच कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहेत.
– ब्लू, पिंक, येलो, ग्रीन आणि ब्लॅक ह्या रंगात उपलब्ध आहेत.
– या दोन्ही फोनमध्ये ड्युअल कॅमेरा आहे.
– प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा देण्यात आलेला आहे.
किंमत –
iPhone 15 Model
– iPhone 15 च्या 128GB मॉडेलची किंमत 79,900 रुपये आहे.
– iPhone 15 च्या 256GB व्हेरियंटची किंमत 89,990 रुपये आहे.
– iPhone 15 च्या हाय-एंड 512GB व्हेरियंटची किंमत 1,09,900 रुपये आहे.
iPhone 15 Plus Model
– iPhone 15 Plus च्या 128GB व्हेरियंटची किंमत 89,900 रुपये आहे.
– iPhone 15 च्या 256GB व्हेरियंटची किंमत 99,900 रुपये आहे.
– iPhone 15 च्या हाय-एंड 512GB व्हेरियंटची किंमत 1,19,900 रुपये आहे.
हे वाचा: Send WhatsApp messages without saving number : नंबर सेव्ह न करता WhatsApp वर मेसेज कसा करायचा?
iPhone 15 Pro Model
– iPhone 15 Pro मॉडेलच्या 128GB बेस व्हेरियंटची किंमत 1,34,900 रुपये आहे.
– iPhone 15 Pro मॉडेलच्या 256GB व्हेरियंटची किंमत 1,44,900 रुपये आहे.
– iPhone 15 Pro मॉडेलच्या 512GB व्हेरियंटची किंमत 1,64,900 एवढी आहे.
– iPhone 15 Pro मॉडेलच्या 1TB व्हेरियंटची किंमत 1,84,900 रुपये आहे.
कॅमेरा –
आयफोन 15 प्रो आणि प्रो मॅक्स दोन्हीमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये नॅचरल टायटेनियम, ब्लू टायटेनिमय, ब्लॅक टायटेनियम आणि व्हाईट टायटेनियम असे चार कलर ऑप्शन्स मिळतात.
टाईप-सी चार्जिंग
या आयफोनमध्ये ऑल-डे बॅटरी लाईफ देण्यात आली आहे. तसेच हे दोन्ही आयफोन यूएसबी-सी चार्जिंगला सपोर्ट करतील. कोणत्याही टाईप-सी चार्जरने यूजर्स आयफोन चार्ज करू शकणार आहेत.
हे वाचा: उपग्रहांना अवकाशात सोडताना आदेश देणारा आवाज हरपला