RBI Recruitment 2023 : भारतातील बँकांची बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (RBI) ऑफिसर पदांसाठी भरती सुरु झाली आहे. जवळपास 300 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी शेक्षणिक पात्रता विविध पदांनुसार वेगवेगळी आहे. तसेच ह्यानंतर काही परीक्षा देखाली द्याव्या लागणार आहे. त्यानंतर उमेदवाराची निवड होणार आहे. तत्पूर्वी या भरतीमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. हा ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती.
RBI Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती सुरु
तरुणांना केंद्रीय बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. त्यासाठी उमेदवारांना बँकेद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत पास होऊन निवड प्रक्रीयेमधून जावं लागणार आहे. रिझर्व्ह बँकेत विविध ऑफिसर्स पदांच्या 291 जागांसाठी ही भरती होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भरती बाबतची सविस्तर माहिती
हे वाचा: Government Job : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 जागांसाठी भरती होणार.
पदाचे नाव आणि पदसंख्या
पदांचे नाव :
1) ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)
2)ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)
3)ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)
एकूण जागा : 291 जागा.
शैक्षणिक पात्रता :
शैक्षणि पात्रता वरील विविध पदांनुसार वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात पाहावी.
वयाची अट :
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 01 मे 2023 पर्यंत 21 ते 30 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट असणार आहे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट दिली जाणार आहे.
शुल्क :
SC, ST आणि PWD प्रवर्गासाठी 100 रुपये शुक्ल असणार आहे तर उर्वरित सर्व प्रवर्गातील म्हणजेच जनरल, OBC आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
हे वाचा: Maharashtra Post Office Recruitment 2023 : महाराष्ट्र पोस्ट सर्कल मध्ये 3 हजार जागांसाठी भरती सुरु
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
RBI Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पहा
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज – येथे करा.
RBI Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा
वरील भरती प्रक्रियेत 9 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच 9 जुलै ते 19 ऑगस्ट 2023 दरम्यान या भरतीबाबतच्या सर्व परीक्षा होणार आहे.
या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.