Thursday , 16 January 2025
Home घडामोडी One Nation One Document : काय असेल हा नवीन कायदा?
घडामोडी

One Nation One Document : काय असेल हा नवीन कायदा?

LetsTalk
One Nation One Document

One Nation One Document : काय असेल हा नवीन कायदा?

येत्या १ ऑक्टोबरपासून येणार नवीन कायदा. वन नेशन वन डॉक्युमेंट.

जन्मदाखला द्या, पॅनकार्ड द्या, लाईट बिल द्या, आधार कार्ड द्या, टेलिफोन बिल द्या, रेशन कार्ड द्या अशी ढीगभर कागदपत्रे सांभाळत बसायची गरज आता पडणार नाही. केवळ जन्मदाखला दिला तरी पुरेसा ठरेल.

हे वाचा: Central Govt - Scrap selling : भंगार विका, पैसे मिळवा.

केंद्रसरकार नवीन कायदा आणायच्या तयारीत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत गेल्या पावसाळी अधिवेशनात जन्म आणि मृत्यूची नोंदणी (सुधारणा) विधेयक, 2023 मंजूर केले गेले. आता शाळेच्या एडमिशनपासून सरकारी कामांसाठी केवळ जन्म दाखला एवढाच एक कागद पुरेसा असेल.

कुठे कुठे एकच कागद लागेल?
त्यानुसार कामकाजात एकूणच पारदर्शकता राहण्यासाठी एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ह्यानुसार आता इथून पुढे शैक्षणिक प्रवेश, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार यादी, आधार क्रमांक, लग्नाची नोंदणी तसेच इतर अनेक कामांसाठी केवळ जन्म दाखल्याचीच गरज असणार आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून ह्या संदर्भातील नवा कायदा लागू होणार आहे. (Only Birth Certificate will be needed)

काय होईल फायदा?
हा नवीन कायदा अस्तित्वात आल्याने नोंदणीकृत राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय डेटाबेस तयार करण्यात मदत होईल.

हे वाचा: India vs Pakistan Football Match : भारत-पाकिस्तनाच्या सामन्यात तुफान राडा; धक्काबुक्कीचा Video व्हायरल.