नोकरी ती ही बँकिंग सेक्टरमध्ये – असिस्टंट मॅनेजर पदावर
नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलोपमेंट म्हणजेच नाबार्डमध्ये असिस्टंट मॅनेजरच्या पदांसाठी भरती सुरु.
हे वाचा: IOCL Apprentice Recruitment 2023 : इंडियन ऑइलमध्ये अप्रेन्टिस म्हणून काम करण्याची संधी
साधारण १५०पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापकाच्या (Asst. Manager) या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 2 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे आणि यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर आहे.
ह्या प्रक्रियेत आधी अर्ज भरून शुल्क भरल्यावर परीक्षा होईल, नंतर मुलाखतीला बोलावले जाईल. परीक्षेचा दिनांक साधारण १६ ऑक्टोबरच्या आसपास असेल.
हे वाचा: EMRS Recruitment 2023 : केंद्र सरकारच्या 'या' शाळांमध्ये 6000 जागांसाठी भरती सुरु
अर्ज करण्यासाठी पात्रता –
उमेदवार जाहिरातीत नमूद केलेल्या विषयातील कोणत्याही विषयाचा मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर. उमेदवाराचे वय १ सप्टेंबर २०२३ रोजी २१ ते ३०वर्षा दरम्यान असावे.
परीक्षेसाठी शुल्क –
परीक्षा अर्जासोबत शुल्क भरणे आवश्यक आहे.
हे वाचा: उपग्रहांना अवकाशात सोडताना आदेश देणारा आवाज हरपला
SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना १५० रुपये/- तर सर्वसाधारण गटातील उमेदवारांना ८०० रुपये/- प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे.
लेखी परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तरांसाठी पाव मार्क कापला जाईल. सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी पगाराचा Band साधारण ९००००च्या घरात आहे.