देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या ग्राहकांची संख्या काही कोटींमध्ये आहेत. असे असले तरी कंपनीकडून नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना ऑफर केली जात असते. नुकतीच एलआयसीने बचत जीवन विमा पॉलिसी लाँच केली आहे. आता ही योजना काय आहे? त्याचे फायदे काय आहे? याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात
बचत जीवन विमा पॉलिसीमध्ये ग्राहकाला विमा मुदतीपेक्षा 8 वर्षे कमी प्रीमियम भरावा लागतो. या प्लॅनमध्ये एकरकमी रक्कम दिली जाते, ज्याला बेसिक सम अॅश्युअर्ड असेही म्हटले जाते. ते किमान 2 लाख आणि कमाल 5 लाख रुपये आहे. तसेच या पॉलिसीमध्ये एक विशेष गोष्ट आहे जी ती इतरांपेक्षा या पॉलिसीला वेगळी बनवते. यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीपेक्षा 8 वर्षे कमी प्रीमियम भरावा लागेल.
हे वाचा: Spicy Market : मसालेदार मार्केट.
एका उदाहरणाद्वारे समजून घेऊयात. समजा तुम्ही 18 वर्षांसाठी पॉलिसी घेतली, तर तुम्हाला फक्त 10 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. या पॉलिसीमध्ये, तुम्हाला किमान 2 लाखांची विमा रक्कम मिळते. त्याच वेळी, कमाल रक्कम 5 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. तुम्ही ही पॉलिसी 15 ते 20 वर्षांसाठी खरेदी करू शकता
परतावा किती मिळेल? : जर तुम्ही या पॉलिसीमध्ये 28 वर्षांच्या वयापासून प्रति वर्ष 12 हजार 83 रुपये ठेवण्यास सुरुवात केली आणि जर तुमची योजना 18 वर्षांची आहे, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 2 लाखांची विमा रक्कम मिळेल. यामध्ये तुम्हाला 4 ते 5 टक्के व्याज मिळेल. या पॉलिसीमध्ये, मूळ विमा रक्कम किंवा वार्षिक प्रीमियमच्या 7 पट मृत्यू लाभ म्हणून उपलब्ध आहे. यामध्ये, भरायची रक्कम मृत्यूच्या तारखेला जमा केलेल्या प्रीमियमच्या 105 टक्क्यांपेक्षा कमी नाही याची खात्री केली जाते.
एलआयसीचे चेअरमन एमआर कुमार यांनी योजनेबाबत माहिती देताना सांगितले की, ही पॉलिसी लॉंच झाल्यापासून 50 हजार पॉलिसी फक्त 10-15 दिवसांत विकल्या गेल्या आहेत. या पॉलिसीची सुरुवात जानेवारी 2023 मध्ये झाली. कुमार म्हणाले की, कंपनी आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी पोर्टफोलिओ मिश्रणावर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीने डिसेंबर तिमाहीत 6334 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत 235 कोटी रुपये होता. प्रीमियममधून कंपनीचे निव्वळ उत्पन्न देखील 97 हजार 620 कोटी रुपयांवरून 1.1 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, असेही त्यांनी सांगितले.