ICC Player of The Month : मागच्या संपूर्ण महिन्यात भारतीय संघाचा उभारता युवा सितारा आणि स्टार बॅट्समन शुभमन गिल (Shubman Gill) याने आपली छाप पडली.
त्याने मागील महिन्यात वनडेत डबल सेंचुरीसह 3 शतके ठोकली होती तर न्यूझीलंड विरुद्धच्या अखेरच्या T-20 सामन्यात तडाखेदार शतक ठोकत अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते. याच कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ (International Cricket Council) म्हणजेच आयसीसीने (ICC) त्याला “आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ” (ICC Player of The Month) घोषित केलं आहे.
हे वाचा: 17 फेब्रुवारी 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…
शुभमन तुफान फॉर्मात
मागील काही काळापासून शुभमन गिल (Shubman Gill) तुफान फॉर्मात आहे. मागील काही दिवसात त्याने सर्वाचं फॉरमॅटमध्ये म्हणजेच कसोटी, वनडे आणि T-20 अशा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकण्यातची कामगिरी या युवा पट्ठ्याने केली आहे. तसेच न्यूझीलंड (New Zealand) सोबत झालेल्या वनडे मालिकेत ठोकलेलं दुहेरी शतक हे अविस्मरणीय होत. पण संध्या ऑस्ट्रेलिया (Australia) सोबत सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या कसोटी मालिकेत (Border Gavaskar Trophy Test series) शुभमन गिलला अद्याप संधी देण्यात आली नाही.
हे वाचा: World Asthma Day : जागतिक अस्थमा दिन 2023 - दिनाचे महत्व काय आहे?