Friday , 17 January 2025
Home Sports ICC Cricket World Cup Facts : ICC क्रिकेट वर्ल्ड कपबद्दल काही रंजक गोष्टी.
Sports

ICC Cricket World Cup Facts : ICC क्रिकेट वर्ल्ड कपबद्दल काही रंजक गोष्टी.

ICC Cricket World Cup Facts
ICC Cricket World Cup Facts

ICC Cricket World Cup Facts : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप (ICC Cricket World Cup 2023) सुरु होण्यासाठी अवघे 10 दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदाचा वर्ल्ड कप भारतामध्ये असल्याने भारतीय क्रिकेट संघाकडून देशवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ह्या वर्ल्ड कपमध्ये मागच्या वर्षी प्रमाणे दहा संघांचा समावेश आहे. यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेदरलँड, इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका असे एकूण दहा संघ असणार आहेत. यंदाच्या वर्ड कपमध्ये पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ क्वालिफाय होऊ शकला नाही. पण तुम्हाला आयसीसी क्रिकेट विश्वचषकाबद्दलच्या या काही रंजक गोष्टी माहित आहेत का?

ICC Cricket World Cup Facts
ICC Cricket World Cup Facts

ICC Cricket World Cup Facts : क्रिकेट विश्वचषकाबद्दल काही रंजक गोष्टी –

हेही वाचा : How IPL Generate Revenue : आयपीएलचे अर्थशास्त्र.

हे वाचा: टीम इंडिया क्रिकेट वर्ल्ड कपसाठी रेडी - Cricket World Cup 2023 - Team India

  1. 1992 च्या वर्ल्डकपपासून खेळताना खेळाडूंनी रंगीत कपडे परिधान करण्यास सुरुवात केली.
  2. 1987 पर्यंत वर्ल्डकप मॅचेस ह्या 60 ओव्हर्सच्या होत्या.
  3. ऑस्ट्रेलिया आणि भारत हे एकमेव देश आहेत ज्यांनी 60 षटकांचा आणि 50 षटकांचा चषक जिंकला आहे.
  4. 60 षटकांचा आणि 50 षटकांचा चषक व्यतिरिक्त ट्वेंटी-20 विश्व करंडक जिंकणारा भारत हा एकमेव देश आहे.
  5. श्रीलंकेच्या मारवान अटापट्टूला विश्वचषक फायनलमध्ये दोनदा संघात असूनही खेळण्याची संधी मिळाली नाही.
  6. पूर्ण सदस्य म्हणून विश्वचषकात दोन वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधित्व करणारा केपलर वेसेल्स हा एकमेव खेळाडू आहे.
  7. अफगाणिस्तानने तीन विश्व ट्वेंटी-20 स्पर्धा खेळून क्रिकेट विश्वचषकात पदार्पण केले.
  8. भारताचा सचिन तेंडुलकर हा 45 सामन्यांमध्ये 2,278 धावांसह सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे आणि त्याने सर्वाधिक शतके (सहा) केली आहेत. 2003 मध्ये 11 सामन्यांतून 673 एका स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
  9. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राने 39 सामन्यांमध्ये सर्वाधिक 71 विकेट घेतल्या आहेत.
ICC Cricket World Cup Facts
ICC Cricket World Cup Facts

ICC Cricket World Cup Facts : ICC World Cup 2023 Schedule – आयसीसी वर्ल्डकप 2023 चं संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने सर्वाधिक 5 वेळा आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला आहे. वेस्ट इंडिजने दोन वेळा तसेच भारतीय संघाने सुद्धा दोन वेळा आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला आहे. तसेच ह्या वर्षीचा वर्ल्ड कप कोण जिंकेल? याच उत्तर येत्या काही दिवसांत समजेल

Related Articles

T20 World Cup 2024 Timetable
Sports

T20 World Cup 2024 Timetable : भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार पुन्हा रंगणार; T20 वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर

T20 World Cup 2024 Timetable : भारत पाकिस्तान सामन्याचा थरार पुन्हा रंगणार...

IPL Auction 2024
Sports

IPL Auction 2024 : आयपीएलचा ऐतिहासिक लिलाव : कोणत्या संघाने कोणते खेळाडू घेतले विकत? पाहा संपूर्ण लिस्ट

IPL Auction 2024 : आयपीएलचा लिलाव नुकताच दुबईमध्ये पार पडला. ह्या वर्षी...