Thursday , 21 November 2024
Home Uncategorized Hikikomori : एकटे राहणे अन एकाकी पडणे…
Uncategorized

Hikikomori : एकटे राहणे अन एकाकी पडणे…

Hikikomori : राखेतून जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याची गोष्ट नेहमी जपानच्या संदर्भात सांगितली जाते. दुसऱ्या महायुद्धात बेचिराख होऊन पुन्हा दुपटीहून अधिक वेगाने उभा राहिलेला देश म्हणजे जपान. प्रचंड विकसित, सर्वात जास्त साक्षर असा जपान देशाबद्दल मोठं आकर्षण सर्वानाच आहे. सद्यस्थितीत जपान एका मोठ्या समस्येशी झगडतोय. हिकिकोमोरी असं त्या समस्येचे नाव आहे.

Hikikomori

हे वाचा: Ayushman Bharat card :आरोग्य कार्ड काढा, सर्व उपचार मोफत होतील…

Hikikomori : ‘हिकिकोमोरी’ म्हणजे नेमकं काय?

हिकिकोमोरी हा जपानमधील एका घटनेचे वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा एक शब्द आहे जिथे व्यक्ती, विशेषत: तरुण, सामाजिक जीवनातून, लकांमध्ये मिसळण्यातून माघार घेतात आणि एकाकी बनतात, अनेकदा त्यांच्या खोलीत, एकटेपणात वर्षे घालवतात. हे केंव्हा घडतं तर जेंव्हा अतिचिंता, नैराश्य, आणि अपयशाची भावना किंवा जीवनात उद्दिष्ट नसतं. अशी व्यक्ती हिकिकोमोरी आहे असं जपानमध्ये समजले जाते. असा अंदाज आहे की जपानमध्ये सुमारे 1 दशलक्ष हिकिकोमोरी आहेत, ह्यात बहुसंख्य पुरुष मंडळी आहेत आणि ही सगळी 15 ते 39 वर्षे वयोगटातील आहेत.

जपानमध्ये हिकिकोमोरीचा प्रसार होण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. मुख्य घटकांपैकी एक म्हणजे तरुण लोकांवर शैक्षणिक आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी दबाव आणला जातो. हा दबाव अगदी घरापासून ते समाजपर्यंत सगळ्याच पातळीवर आणला जातोय. ज्यामुळे तणाव आणि चिंतेची भावना निर्माण होते. आणखी एक कारणीभूत घटक म्हणजे जपानमधील बदललेले पारंपारिक कौटुंबिक चित्र. न्यूक्लिअर फॅमिली वाढायला लागल्यात. ज्यामुळे तरुणांना डिस्कनेक्ट वाटू शकते.

Hikikomori : जपान सरकारकडून प्रयत्न सुरु…

आता जपानी सरकारने हिकिकोमोरीची समस्या ओळखली आहे आणि ती सोडवण्यासाठी पावले उचलली आहेत. सरकारने संशोधनासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे हिकिकोमोरी आजाराने प्रभावित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना समुपदेशन सेवा पुरविण्यास सुरुवात केली आहे. अर्थात ह्यातून बाहेर पडायला बराच वेळ जावा लागणार आहे.

हे वाचा: If You Struggle To Hit Your Goals, Try This Instead

Related Articles

Uncategorized

Diwali Ank 2024: आकर्षक कथा आणि प्रेरणादायक लेखांचा संग्रह!

Diwali ank 2024 | दिवाळी अंक 2024: मराठी साहित्याचा उत्सव दिवाळी म्हणजे...

SSC GD Constable Recruitment 2024
Uncategorized

SSC GD Constable Recruitment 2024 : SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26 हजार 146 जागांसाठी मेगा भरती सुरु; असा करा अर्ज

SSC GD Constable Recruitment 2024 : तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी...

G20-SUMMIT-2023
Uncategorized

G20 Summit 2023 : G20 परिषद

G20 Summit 2023 – आजपासून दिल्लीत G20 परिषद सुरु झाली. कोण कोणते...

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana
Uncategorized

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना.

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana ; पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना...