Friday , 17 January 2025
Home Uncategorized Everyone who receives a salary from a private company should know these five rules! : खासगी कंपनीतून सॅलरी घेणाऱ्या प्रत्येकाला ‘हे’ पाच नियम माहित असायला हवे!
Uncategorized

Everyone who receives a salary from a private company should know these five rules! : खासगी कंपनीतून सॅलरी घेणाऱ्या प्रत्येकाला ‘हे’ पाच नियम माहित असायला हवे!

Everyone who receives a salary from a private company should know these five rules! : जरी तुम्ही खासगी कंपनीत काम करत असाल तरीही सरकारने नोकरी करणाऱ्यांच्या बाजूने काही कायदे केले आहेत. त्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या हक्कांसाठी आवाज उठवू शकता. अशा परिस्थितीत जर एखाद्या कंपनीने एखाद्या कर्मचाऱ्याला चुकीच्या पद्धतीने कामावरून काढून टाकले तर कर्मचारी म्हणून तुम्हाला काही नियम माहित असायला हवे. तुम्ही अगदी कुठेही काम करत असाल आणि पगारदार असाल तर तुम्हाला तुमच्या हक्काचे 5 महत्त्वाचे नियम माहित असणे आवश्यक आहे, चला त्याबाबत अधिक सविस्तर या लेखामध्ये जाणून घेऊयात…

नियम क्रमांक 1 : तज्ञांच्या मते, भारतीय कामगार कायद्यात पगारदार कर्मचार्‍यांसाठी कोणत्याही नोकरीत छाटणीची प्रक्रिया फारशी स्पष्ट नाही. तथापि, 1947 च्या औद्योगिक विवाद कायद्याचे कलम 25 काही अटींच्या अधीन कर्मचाऱ्यांना छाटणीपासून संरक्षण करते. यानुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने 12 महिन्यांत 100 दिवस किंवा त्याहून अधिक दिवस काम केले असेल, तर त्याला नोकरीवरून काढण्यापूर्वी सरकारी प्राधिकरणाची मंजुरी घ्यावी लागेल. एवढेच नाही तर कंपनीने त्या कर्मचाऱ्याला नोटीस द्यावी आणि छाटणी केलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस आणि नुकसान भरपाई देखील द्यावी लागेल. त्यामुळे कंपनी जॉईन करताना जॉब कॉन्ट्रॅक्ट आणि कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचले पाहिजे. कंपनीने आपल्या कागदपत्रांनुसार अटी व शर्तींची पूर्तता केली नाही, तर कर्मचारी न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकतो.

हे वाचा: It really have good feeling when you enjoy nature

नियम क्रमांक 2 : लैंगिक छळ कायदा महिलांना ऑफिस किंवा कंपनीत होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण देतो. यानुसार, शारीरिक शारीरिक संबंध, दबाव किंवा लैंगिक छळ, कोणत्याही प्रकारची अश्लील टिप्पणी करणे, अश्लील फिल्म किंवा फोटो दाखवणे यासारख्या गोष्टींचा या गुन्ह्यात समावेश आहे. अशा कोणत्याही परिस्थितीत कंपनीने अंतर्गत समिती स्थापन करून चौकशी करावी, असे कायदा सांगतो. महिला कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या हक्कांबाबत जागरुक असायला हवे. त्याचबरोबर पुरुष कर्मचाऱ्यांनीही असे कृत्य करणे टाळावे. अशा परिस्थितीत लैंगिक छळ करणाऱ्यांना कंपनीतून काढून टाकले जाऊ शकते किंवा त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

नियम क्रमांक 3 : ग्रॅच्युईटी पेमेंट कायदा 1972 च्या नियमांनुसार, ग्रॅच्युईटीची रक्कम मिळविण्यासाठी कर्मचाऱ्याला किमान 5 वर्षे एकाच कंपनीत काम करावे लागते. याआधी कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू किंवा अपघात झाला असेल, तर हा नियम लागू होत नाही. मात्र, 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर असे झाल्यास ही रक्कम त्याच्या नॉमिनीला देण्यात येते. पेमेंट टाळण्यासाठी कंपनीने कोणतेही चुकीचे पाऊल उचलले तर त्यावर कारवाई होऊ शकते, असे कायदा सांगतो. दरम्यान तुरुंगवासापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. जर कर्मचाऱ्याने जाणूनबुजून कंपनीचे नुकसान करण्याचा प्रयत्न केल्यास ग्रॅच्युईटी जप्त केली जाऊ शकते, असेही नियमात नमूद करण्यात आले आहे.

नियम क्रमांक 4 : कोणत्याही कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना गरोदरपणात प्रसूती रजेची सुविधा मिळते. प्रसूती रजा दुरुस्ती कायदा 2017 नुसार, सध्याच्या कंपनीत एका वर्षात 80 दिवस काम केलेल्या महिला कर्मचाऱ्यांना हा लाभ उपलब्ध आहे. रजा दैनंदिन वेतनावर आधारित आहे. गर्भवती महिलांना 26 आठवड्यांची प्रसूती रजा मिळते. हे अपेक्षित तारखेच्या 8 आठवड्यांपूर्वी सुरू होऊ शकते. यामध्ये काही अटी आहेत. पहिल्या दोन गरोदरपणात महिला या रजेचा लाभ घेऊ शकतात. तिसऱ्या मुलासाठी, रजा फक्त 12 आठवड्यांसाठी आहे.

हे वाचा: Free access under RTE : पालकांनो, आरटीईअंतर्गत मोफत प्रवेश, कागदपत्रे ते ऑनलाईन अर्ज… वाचा एका क्लिकवर

नियम क्रमांक 5 : विमा आणि आर्थिक सहाय्य 1948 च्या कायद्याप्रमाणे, कर्मचारी राज्य विमा महामंडळ (कर्मचारी राज्य विमा निगम) आपत्कालीन परिस्थितीसाठी कर्मचाऱ्यांना विमा देते. यामध्ये अपघात, आजारपण, प्रसूती रजा अशा परिस्थितीत आर्थिक मदत दिली जाते. कर्मचार्‍यांसोबत त्यांच्या कुटुंबियांनाही या विमा पॉलिसी अंतर्गत संरक्षण दिले जाते. नोकरीवर असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक लाभ दिला जातो.

Related Articles

Uncategorized

Diwali Ank 2024: आकर्षक कथा आणि प्रेरणादायक लेखांचा संग्रह!

Diwali ank 2024 | दिवाळी अंक 2024: मराठी साहित्याचा उत्सव दिवाळी म्हणजे...

SSC GD Constable Recruitment 2024
Uncategorized

SSC GD Constable Recruitment 2024 : SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26 हजार 146 जागांसाठी मेगा भरती सुरु; असा करा अर्ज

SSC GD Constable Recruitment 2024 : तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी...

G20-SUMMIT-2023
Uncategorized

G20 Summit 2023 : G20 परिषद

G20 Summit 2023 – आजपासून दिल्लीत G20 परिषद सुरु झाली. कोण कोणते...

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana
Uncategorized

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना.

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana ; पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना...