DTP Maharashtra Recruitment 2023 : दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती सुरु झालेली आहे. ह्या भरती अंतर्गत एकूण 125 जागा भरण्यात येणार आहे.
DTP Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती सुरु
राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती सुरु झालेली आहे. दहावी उत्तीर्ण असणारे उमेदवार ह्या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज दाखल करू शकतात. या भरती प्रक्रियेबाबतची जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ह्या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या याबाबतची संपूर्ण माहिती.
हे वाचा: MSC Bank Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती सुरु; असा करा अर्ज
DTP Maharashtra Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया
पदांचा संपूर्ण तपशील पुढीलप्रमाणे
पदाचे नाव : शिपाई (गट-ड)
हे वाचा: Post Office Recruitment 2023 : डाक विभागाची महाराष्ट्र सर्कलमध्ये भरती सुरु
एकूण जागा : या भरती प्रक्रिये अंतर्गत एकूण 125 जागा भरण्यात येणार आहे. पण विभागानुसार या जागा विभागल्या गेल्या आहेत. कोणत्या विभागासाठी किती जागा आहेत? जाणून घ्या.
कोणत्या विभागासाठी किती जागा?
कोकण – 28 जागा
पुणे – 48 जागा
नाशिक – 09 जागा
छ. संभाजीनगर – 11 जागा
अमरावती – 10 जागा
नागपूर – 19 जागा
हे वाचा: SSC CPO Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती सुरु.
एकूण जागा : 125 जागा
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
वयाची अट :
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष अर्ज करण्याच्या दिनांकास 18 ते 40 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. खेळाडू, आदुघ, अनाथ तसेच मागासवर्गीय उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट असणार आहे
शुल्क :
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये (₹1000/-) शुल्क असणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नऊशे रुपये (₹900/-) शुल्क असणार आहे. तसेच माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.
DTP Maharashtra Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पहा
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज – येथे करा.
DTP Maharashtra Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा
वरील भरती प्रक्रियेत 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.