Bank Note Press Recruitment 2023 : शिक्षित तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. केंद्र सरकारच्या बँक नोट मुद्रणालयात महत्वाच्या पदांसाठी भरती सुरु झालेली आहे. याबाबतची जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवार 21 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. तसेच ही भरती IBPS मार्फत घेण्यात येणार आहे.
Bank Note Press Recruitment 2023 : बँक नोट मुद्रणालयात भरती सुरु
हे वाचा: MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या
बँक नोट मुद्रणालयात भरती सुरु झालेली आहे. या भरती अंतर्गत वेगवेगळ्या पदांच्या एकूण 111 जागा भरण्यात येणार आहे. ह्यामुळे तरुणांसाठी ही सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज कसा आणि कुठे करायचा? शैक्षणिक पात्रता काय आहे? जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.
Bank Note Press Recruitment : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया
पदांचा संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
1 | सुपरवाइजर (प्रिंटिंग) | 08 | प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा B.E/B.Tech | 18 ते 30 वर्षे |
2 | सुपरवाइजर (कंट्रोल) | 03 | प्रथम श्रेणी प्रिंटिंग/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / IT/कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा किंवा B.E/ B.Tech/B.Sc Engg. | 18 ते 30 वर्षे |
3 | सुपरवाइजर (IT) | 01 | प्रथम श्रेणी IT/कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा किंवा B.E/B.Tech/B.Sc Engg. | 18 ते 30 वर्षे |
4 | ज्युनियर ऑफिस असिस्टंट | 04 | 1) 55% गुणांसह पदवीधर
2) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40.श.प्र.मि./हिंदी 30.श.प्र.मि. |
18 ते 28 वर्षे |
5 | ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) | 27 | प्रिंटिंग ट्रेड मध्ये NCVT/SCVT/ITI (प्रिंटिंग ट्रेड-लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI (प्लेट मेकर-कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा | 18 ते 25 वर्षे |
6 | ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल) | 45 | प्रिंटिंग ट्रेड मध्ये NCVT/SCVT/ITI (प्रिंटिंग ट्रेड-लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI (प्लेट मेकर-कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा | 18 ते 25 वर्षे |
7 | ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी-अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) / लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) / मशीनिस्ट / मशीनिस्ट ग्राइंडर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) | 15 | ITI (अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)/ लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) / मशीनिस्ट / मशीनिस्ट ग्राइंडर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) | 18 ते 25 वर्षे |
8 | ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल/AC) | 03 | ITI (फिटर) | 18 ते 25 वर्षे |
9 | ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT) | 04 | ITI (इलेक्ट्रिकल/IT) | |
10 | ज्युनियर टेक्निशियन (सिव्हिल/पर्यावरण) | 01 | ITI (वेल्डर) | 18 ते 25 वर्षे |
वयाची अट :
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 21 ऑगस्ट 2023 पर्यंत सरासरी 18 ते 30 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. साहजिकच पदांप्रमाणे वयोमर्यादा वेगवेगळी असणार आहे. तसेच यामध्ये मागासवर्गीयांना म्हणजेच SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षांची सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षांची सूट असणार आहे.
शुल्क :
हे वाचा: SBI Recruitment : 439 Posts - स्टेट बँकेत मोठी भरती
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल, ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना सहाशे रुपये (₹600/-) शुल्क असणार आहे तर एससी, एसटी अशा मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना दोनशे रुपये (₹200/-) शुल्क असणार आहे.
Bank Note Press Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पाहा.
जाहिरात (Notification) – अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
ऑनलाईन अर्ज – येथे Click करा.
Bank Note Press Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा –
या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 21 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच परीक्षा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2023 मध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेबाबतची संपूर्ण माहिती नंतर कळविण्यात येणार आहे.
या भरती प्रकियेबाबत काही अडचण आल्यास तुम्ही अधिक माहितीसाठी वरील जाहिरात पाहू शकता.