All about Nobel Prize : नोबेल पारितोषिक हा एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे जो भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र किंवा शरीरविज्ञान, साहित्य, शांतता आणि आर्थिक विज्ञान या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दरवर्षी दिला जातो. स्वीडिश संशोधक, शास्त्रज्ञ आणि परोपकारी आल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेनुसार, नोबेल पारितोषिक 1901 पासून दिले जात आहेत.
हे वाचा: PM Modi US Visit : मोदींसाठी आयोजित केलेल्या स्टेट डिनर मध्ये कोण-कोणते दिग्गज आले होते?
All about Nobel Prize : सबकुछ नोबेल पुरस्काराविषयी
प्रत्येक नोबेल पारितोषिकात पदक (Medal), सन्मानपत्र आणि रोख पुरस्कार असतो. प्रत्येक श्रेणीसाठी विशिष्ट विविध समित्या आणि संस्थांद्वारे विजेते निवडले जातात. नोबेल शांतता पुरस्कार ओस्लो, नॉर्वे येथे दिला जातो, तर इतर पुरस्कार स्टॉकहोम, स्वीडन येथे प्रदान केले जातात.
All about Nobel Prize : नोबेल पुरस्कार कोणाला दिला जातो?
नोबेल पारितोषिके अशा व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित करतात ज्यांनी या क्षेत्रात मानवतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, जगभरात प्रगती, नावीन्य आणि शांतता वाढवली आहे. ते जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त पुरस्कार राहिले आहेत.
हे वाचा: Indri Whisky : जगातील NO.1 Whisky - भारताची इंद्री व्हिस्की.
All about Nobel Prize : या वर्षीचा नोबेल पुरस्कार कोणाला?
ह्या वर्षीच्या पुरस्कारांची (Nobel Prize 2023) घोषणा कालपासून म्हणजे 2 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. सर्वात आधी शरीरविज्ञान ह्या विषयाशी निगडित पुरस्कार जाहीर झाले आहेत. कोरोना लसीसंदर्भातील संशोधनासाठी कॅटालिन कॅरिको आणि ड्रयू वेसमन ह्या दोघांना पुरस्कार मिळाला आहे.
All about Nobel Prize : मृत्यूनंतर नोबेल पुरस्कार दिला जात नाही
ह्या नोबेल पुरस्काराचे वैशिष्ठय असे की मृत्यूनंतर हा पुरस्कार दिला जात नाही. केवळ हयात असणाऱ्या लोकांनाच त्यांच्या कर्तबगारीविषयी पुरस्कार दिला जातो. अपवाद म्हणून आजवर केवळ दोघं जणांनाच मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेला आहे.
हे वाचा: Maratha Reservation : मनोज जरांगेची तब्येत बिघडली
गणित ह्या विषयाशी संबंधित कोणत्याही संशोधनासाठी नोबेल दिला जात नाही. कारण स्वीडन मध्ये आधीपासूनच गणितासाठी पुरस्कार दिला जात असल्याने असा पुरस्कार आल्फ्रेड नोबेलने देऊ नये असे म्हटलेले होते.
दरवर्षी 10 डिसेम्बरला म्हणजे आल्फ्रेड नोबेलच्या पुण्यतिथीदिनी नोबेल पुरस्काराचे वितरण केले जाते.