‘ब्लूटूथ’ हे नाव नक्की कसे पडले? जाणून घ्या रंजक कहाणी…
डिजीटल मीडियाच्या जमान्यात सर्वांनाच ब्लूटूथबद्दल माहिती आहे. तुम्ही घरी असाल, कारमध्ये किंवा ऑफिसमध्ये, ब्लूटूथची कधी ना कधी गरज भासतेच. आता प्रगत तंत्रज्ञान असलेली अनेक ब्लूटूथ उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, ब्लूटूथमध्ये दातांचे कोणतेही कार्य नसते, तरीही त्याला ब्लूटूथ का म्हणतात? बहुतेक लोकांना याची माहिती नसेल. त्याचे नाव ब्लूटूथ का ठेवले गेले? याबद्दल आजच्या लेखामध्ये जाणून घेऊयात…
हे वाचा: World Heritage Day : जागतिक वारसा दिवस.
ब्लूटूथचा दातांशी काहीही संबंध नाही, तरीही त्याला ब्लूटूथ म्हणतात. या उपकरणाच्या नावामागे राजाचे नाव दडलेले आहे. हा राजा युरोपातील एका देशाचा होता. हे नाव मध्ययुगीन स्कॅन्डिनेव्हियन राजा हॅराल्ड गोर्मसन यांच्या नावावर आहे. नॉर्वे, डेन्मार्क आणि स्वीडनच्या राजांना स्कॅन्डिनेव्हियन राजे म्हटले जायचे.
असे अनेक अहवाल समोर आले आहेत ज्यात असे सांगण्यात आले आहे की, या राजाला ब्लाटन या नावाने देखील संबोधले जात होते. डॅनिशमधून इंग्रजीमध्ये अनुवादित, blatǫnn म्हणजे ब्लूटूथ. हॅराल्ड गोर्मसन म्हणजेच ब्लॅटन राजाला ब्लूटूथ म्हटले जात असे.
यामागे राजाचा एक दात पूर्णपणे कुजल्याचे कारण सांगण्यात आले आहे. राजाच्या दाताचा रंग निळा झाला होता. राजाच्या या दातात जीव नव्हता. यामुळेच या राजाला ब्लूटूथ नावाने संबोधले जात होते. या उपकरणासाठी या राजाचे हे नाव त्याच्या निर्मात्यांच्या मनात कसे आले? आता ते पाहूयात…
हे वाचा: Good Day To Take A Photo With Your Favorite Style
ब्लूटूथ SIG ने तयार केले होते. ब्लूटूथ बनवणारा जाप हार्टसेन एरिक्सन कंपनीत रेडिओ सिस्टीमसाठी काम करत होता, असं म्हटलं जातं. एरिक्सनबरोबरच नोकिया, इंटेल या कंपन्याही ब्लूटूथ उपकरणांच्या निर्मितीमध्ये गुंतल्या होत्या. ब्लूटूथ बनवण्यासाठी अनेक कंपन्यांनी मिळून SIG (स्पेशल इंटरेस्ट ग्रुप) ग्रुप तयार केला. SIG ने राजाच्या नावावर ब्लूटूथ असे नाव दिले.