Chaturmas : चालू वर्षी (2023) लग्न तिथी कमी असल्या, तरी चिंता करण्याचे कारण नाही. कारण यंदा अधिकमास-चातुर्मास काळातही लग्न करता येणार आहे. त्यासाठी दिवाळीनंतर तुळशीच्या विवाहाची वाट पाहण्याची आशक्यता नाही. एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान आपत्कालीन जवळपास 37 लग्न तिथी पंचांग कर्त्यांनी दिले आहेत. मग, काय उडू द्या लग्नाचा बार…
मुख्य काळातील लग्न तिथी –
मे : 2, 3, 4, 7, 9, 10,11, 12, 15, 16, 21, 22, 29, 30.
जून : 1, 3, 7, 8, 11, 12, 13, 14, 26, 27, 28.
डिसेंबर : 6, 7, 15, 17, 20, 21, 25, 26, 31.
हे वाचा: Preparation for firefighter recruitment :अग्निवीर भरतीची तयारी करताय? मग अगोदर ही बातमी वाचा…
गौणकाल आणि आपत्कालीन मुहूर्त –
एप्रिल : 15, 23, 24, 29, 30.
जून : 30,
जुलै : 1, 2, 4, 5, 9, 10, 11, 14.
ऑगस्ट : 22, 26, 28, 29
सप्टेंबर : 3, 6, 7, 8, 17, 24, 26.
ऑक्टोबर : 16, 20, 22, 23, 24, 26.
नोव्हेंबर : 1, 6, 16, 18, 20, 22.
अधिकमास : 18 जुलै ते 16 ऑगस्ट
चातुर्मास : 29 जून ते 23 नोव्हेंबर
आपत्कालीन विवाह मुहूर्त कोणासाठी? : विशेषतः चातुर्मासात आपत्कालीन व मुहूर्त देण्यात आले आहेत. ज्यांचे आधीच लग्न ठरले आहे किंवा साखरपुडा झाला आहे, घरात कोणी ज्येष्ठ व्यक्ती आजारी आहे, त्यांच्या डोळ्यासमोर लग्न लावायचे आहे किंवा कोणाची नोकरी विदेशात आहे. त्यांना दिवाळीनंतर सुट्टया मिळत नाहीत. अशांनी आपत्कालात विवाह करावा, तसेच मुख्य काळात मंगल कार्यालय उपलब्ध झाले नाही; काही अडचणी आली, तरी आपत्कालात विवाह करावा.
हे वाचा: You will get cheap sand : स्वस्तात वाळू मिळणार, पण नक्की कधी? वाचाच…