Solapur News : कधी पाऊसाचा अतिमारा, कधी कोरडा दुष्काळ कधी शेतपिकांवर येणार रोग तर कधी शेतमालाला मिळणारा कमी भाव अशा सर्व संकटांवर मात करत शेतकरी पुन्हा थाटात उभा राहतो. जणू सगळ्या जगाला पोसायचे भार यांच्याकडेच आहे अशा विचाराने तो पुन्हा नव्या जोमाने काम करून शेतात वृंदावन फुलवतो. शेवटी या मातीला आई मानणारा तो आईच्या या लेकरांना तरी उपाशी ठेवण्याचा विचार कसा करेल तो. तरीही शेतकरी हा समाजात थट्टेचा विषय.
सध्या कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हा संकटात सापडला आहे. त्यातच सोलापूर बाजार समितीमधील व्यापाराने कांद्याची 10 पोती विकल्यावर शेतकऱ्याच्या हातात फक्त २ रुपये दिले आहेत. एवढाच नाही तर हे 2 रुपये चेकद्वारे देऊन व्यापाराने जणू शेतकऱ्याची एक प्रकारे ताटातच उडवली आहे. राजेंद्र तुकाराम चव्हाण असं या कांदा उत्पादक शेतकऱ्याच नाव आहे.
राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकऱ्याने 17 फेब्रुवारीला 10 पोते कांदा म्हणजे जवळपास 500 किलो कांदा सोलापूर मार्केट यार्डातील सुर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्याकडे विकला होता. या व्यापाराने मोटारभाडे, हमाली, तोलाई याचे पैसे वजा करुन शेतकऱ्याच्या हातात फक्त 2 रुपयांचा चेक टेकवला.
Solapur News : राजू शेट्टी आक्रमक –
शेतकऱ्याला दिलेला 2 रुपयांचा चेक पाहून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्ववीत करत शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा? असा प्रश्न विचारला आहे.
राजू शेट्टी काय म्हणाले?
“राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतक-यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा? एका बाजूला थकबाकी पोटी शेतक-यांची वीज कनेक्शन धडाधड तोडता आणि डोळ्या समोर पीक करपून जातं. राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये 10 पोती कांदे विकल्यावर त्याला किती पैसे आले,”