IDBI Bank Recruitment : चांगल्या मोठ्या बँकेत नोकरी (Bank job) करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ज्यांचं पदवी पर्यंत शिक्षण झालं आहे आणि ज्यांना बँकिंग क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे अशा उमेदवारांसाठी IDBI बँकेत (IDBI Bank Recruitment) भरती सुरु झाली आहे. IDBI बँकेत (IDBI Bank Recruitment) विविध रिक्त पदांच्या 600 पेक्षा अधिक जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी पात्रता काय? कोणत्या पदासाठी भरती होणार आहे तसेच अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या याबाबतची सर्व माहिती.
IDBI Bank Recruitment : पदांचे नाव आणि तपशील –
IDBI बँकेत (IDBI Bank Recruitment) असिस्टंट मॅनेजर या रिक्त पदासाठी तब्बल 600 जागांवर भरती होणार आहे. तसेच परीक्षा ही एप्रिलमध्ये घेण्यात येणार आहे.
हे वाचा: तुमच्यासाठी जिओचा बेस्ट रिचार्ज प्लॅन कोणता? एकदा संपूर्ण यादी तपासून पाहा..
IDBI Bank Recruitment : शैक्षणिक पात्रता –
IDBI बँकेत (IDBI Bank Recruitment) असिस्टंट मॅनेजर पदाच्या नोकरीकरिता तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक आहे. तसेच बँकिंग वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात दोन वर्षांचा अनुभव असणे देखील गरजेचे आहे.
IDBI Bank Recruitment : वयाची अट –
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच SC आणि ST या प्रवर्गाच्या उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट देण्यात आली आहे तर OBC या प्रवर्गासाठी 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
IDBI Bank Recruitment : परीक्षा शुल्क –
अर्ज करताना जनरल आणि OBC या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावे लागणार आहे तर SC, ST आणि PWD या प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे.
हे वाचा: Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना.
IDBI Bank Recruitment : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
ऑनलाईन अर्ज – ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
IDBI Bank Recruitment : महत्वाच्या तारखा :
वरील भरती प्रक्रियेत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत असणार आहे. तर परीक्षा एप्रिल 2023 मध्ये होणार आहे.