IB Recruitment 2023 : दहावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या (Ministry of Home Affairs) अंतर्गत येणाऱ्या गुप्तचर विभागात भरती (Intelligence Bureau Recruitment 2023) सुरु झालेली आहे. ह्या भरती अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ (Multi-Tasking Staff) सारख्या जागा भरण्यात येणार आहे. तसेच शैक्षणि पात्रता दहावी पास असणार आहे. जाणून घेऊयात या भरती विषयी सविस्तर माहिती…
IB Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु
केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु झालेली आहे. ह्या बाबतची अधिकृत जाहिरात संबंधित विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार ह्या भरती अंतर्गत विविध पदांच्या 677 जागा भरण्यात येणार आहे. केंद्रीय गुप्तचर विभागाच्या भरती (IB Bharti 2023) प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कुठे आणि कसा करायचा? जाणून घ्या या बाबतची सविस्तर माहिती….
हे वाचा: AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.
IB Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
1 | सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT) | 362 | 1) 10वी उत्तीर्ण.
2) हलके वाहन चालक परवाना (LMV) 3) 01 वर्ष अनुभव |
2 | मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) | 315 | 10वी उत्तीर्ण. |
Total – 677 |
केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु : वयोमर्यादा
पद क्र.1 : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 13 नोव्हेंबर 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
पद क्र.2 : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 13 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे.
वयात सूट :
हे वाचा: IDBI Bank Recruitment 600 Posts : IDBI बँकेत भरती.
या भरती प्रक्रियेमध्ये मागासवर्गीय प्रवर्गाला वयामध्ये 5 वर्षे सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 03 वर्षांची सूट असणार आहे.
केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु : शुल्क
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल (Genera), ओबीसी (OBC) आणि इडब्लूएस (EWS) या प्रवर्गातील उमेदवारांना पाचशे रुपये (₹500/-) शुल्क असणार आहे तर एसटी (ST), एससी (SC), ExSM आणि महिला उमेदवारांना चारशे पन्नास रुपये (₹450/-) शुल्क असणार आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये कुठेही
IB Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here)
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here)
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –
वरील भरती प्रक्रियेत 13 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच परीक्षा कधी आहे? या बाबतची सविस्तर माहिती संबंधित विभागाकडून नंतर कळविण्यात येणार आहे. या नोकरी संबंधिताच्या अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया वरती देलेली जाहिरात पाहा किंवा इथे क्लीक करा (Click Here).