Krushi Sevak Bharti 2023 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आधी भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3 हजार 154 जागांसाठी भरती सुरु होती. त्यानंतर तलाठी भरती तसेच ज़िल्हा परिषद भरती सुरु झाली होती आणि आता महाराष्ट्र कृषी विभागात ‘कृषी सेवक’ पदाच्या 2 हजार 109 जागांसाठी भरती सुरु झालेली आहे. त्यामुळे मागील काही काळापासून महाराष्ट्रातील तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याच्या काही महत्वाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
Krushi Sevak Bharti 2023 : महाराष्ट्र कृषी विभागात ‘कृषी सेवक’ पदांसाठी भरती सुरु
महाराष्ट्र कृषी विभागात ‘कृषी सेवक’ पदांसाठी लवकरच भरती सुरु होणार आहे. ह्या भरती अंतर्गत ‘कृषी सेवक’ पदांच्या तब्बल 2 हजार 109 जागा भरण्यात येणार आहे. या भरती बाबतची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. ह्या भरतीमध्ये कोण-कोण अर्ज करू शकत? ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? शैक्षणिक पात्रता काय आहे? जाणून घ्या याबाबतची संपूर्ण माहिती.
हे वाचा: RBI Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांच्या जागांसाठी भरती सुरु.
Krushi Sevak Bharti 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया
पदाचे नाव आणि पदसंख्या यांचा संपूर्ण तपशील पुढीलप्रमाणे :
पदाचे नाव : कृषी सेवक
विभागनिहाय पदसंख्या खालीलप्रमाणे
- अमरावती – 227 जागा
- छ. संभाजीनगर – 196 जागा
- कोल्हापूर – 250 जागा
- लातूर – 170 जागा
- नागपूर – 448 जागा
- नाशिक – 336 जागा
- पुणे – 188 जागा
- ठाणे – 294 जागा
एकूण पदसंख्या : 2 हजार 109 जागा
शैक्षणिक पात्रता
हे वाचा: Nashik Police Patil Bharti 2023 : नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांसाठी भरती सुरु
शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.
वयाची अट :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 11 ऑगस्ट 2023 पर्यंत 19 ते 38 वर्षे या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गाला वयामध्ये 5 वर्षे सूट असणार आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही
शुल्क :
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल आणि ओबीसी (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये (₹1000/-) शुल्क असणार आहे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना नऊशे रुपये (₹900/-) शुल्क असणार आहे.
सरकारी नोकरी 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पहा
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज – येथे करा.
अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
सरकारी नोकरी 2023 : महत्वाच्या तारखा
वरील भरती प्रक्रियेत 03 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.