IPPB Bank Recruitment 2023 : पदवीधर असणाऱ्या तरुणांना सरकारी बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती (India Post Payments Bank Recruitment 2023) सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार 16 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. जाणून घ्या या भरती बाबतची सविस्तर माहिती.
IPPB Bank Recruitment 2023 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती सुरु
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नुकतीच भरती सुरु झालेली आहे. याबाबत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये भाग घायचा असल्यास ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? शैक्षणिक पात्रता काय आहे? जाणून घेऊयात अर्ज प्रक्रियेबाबतची संपूर्ण माहिती.
हे वाचा: Exim Bank Recruitment 2023 : भारतीय निर्यात-आयात (India Exim Bank) बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करायचा?
IPPB Bank Recruitment 2023 : जाणून घ्या अर्ज प्रक्रिया –
पदांबाबतचा संपूर्ण तपशील खालील प्रमाणे :
पदाचे नाव : एक्झिक्युटिव
पदसंख्या : एकूण 132 जागा
(वेगवेगळ्या प्रवर्गानुसार पदांची संख्या निश्चित केलेली आहे. पदांच्या संपूर्ण माहितीसाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पाहा.)
हे वाचा: SSC Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत हवालदार पदांच्या 1558 जागांसाठी भरती सुरु.
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा :
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 01 जून 2023 पर्यंत सरासरी 21 ते 35 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये मागासवर्गीयांना म्हणजेच SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षांची सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षांची सूट असणार आहे.
हे वाचा: EMRS Recruitment 2023 : केंद्र सरकारच्या 'या' शाळांमध्ये 6000 जागांसाठी भरती सुरु
शुल्क :
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल आणि ओबीसी (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांना तीनशे रुपये (₹300/-) शुल्क असणार आहे तर एससी (SC), एसटी (ST) आणि पीडब्ल्यूडी (PWD) अशा मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपये (₹100/-) शुल्क असणार आहे.
IPPB Bank Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पाहा.
जाहिरात (Notification) – अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
ऑनलाईन अर्ज – येथे Click करा.
IPPB Bank Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा –
या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 16 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच परीक्षा कधी घेण्यात येणार आहे? याबाबतची संपूर्ण माहिती नंतर कळविण्यात येणार आहे.
या भरती प्रकियेबाबत काही अडचण आल्यास तुम्ही अधिक माहितीसाठी वरील जाहिरात पाहू शकता. तसेच कोणतीही अडचण आल्यास इंडियन पोस्ट बँकेच्या [email protected] या अधिकृत मेल आयडी (E-mail ID) वर तम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.