Thursday , 21 November 2024
Home Jobs SSC CPO Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती सुरु.
Jobs

SSC CPO Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती सुरु.

SSC CPO Recruitment 2023
SSC CPO Recruitment 2023 : Letstalk Jobs

SSC CPO Recruitment 2023 : पदवीधर असणाऱ्या तरुण आणि तरुणींसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC Recruitment 2023) मार्फत उच्च पदांसाठी मोठी भरती सुरु झालेली आहे. याबाबत एसएससीने (SSC) नोटिफिकेशन जारी केले आहे. ह्यामध्ये फक्त महिलांसाठी देखील काही जागा असणार आहेत. ह्या भरतीमध्ये मागासवर्गीय आणि काही प्रवर्गातील उमेदवारांना विशेष सूट दिली जाणार आहे.

SSC CPO Recruitment 2023
SSC CPO Recruitment 2023 :  सरकारी नोकरी

SSC CPO Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती सुरु

हे वाचा: Government Job : 'ही' सरकारी नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या.

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC Recruitment 2023) अंतर्गत मेगा भरती सुरु झाली आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1 हजार 876 जागा भरल्या जाणार आहे. शैक्षणिक पात्रता केवळ उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे गरजेचं आहे. तसेच ह्यासाठी ‘दिल्ली पोलीस आणि CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2023’ ही परीक्षा द्यावी लागणार. तत्पूर्वी या भरतीमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया कशी आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

SSC CPO Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया

पदांचा संपूर्ण तपशील : पदाचे नाव आणि पदसंख्या

पद क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
1 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष) 109 पदवीधर
2 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला) 53 पदवीधर
3 CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 1,714 पदवीधर
एकूण जागा : 1 हजार 876 जागा

वयोमर्यादा :

हे वाचा: Bank of Maharashtra Bharti 2023 : बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये भरती सुरू; अर्ज कुठे आणि कसा करायचा? जाणून घ्या.

या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 01 ऑगस्ट 2023 पर्यंत सरासरी 20 ते 25 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये मागासवर्गीयांना म्हणजेच SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षांची सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षांची सूट असणार आहे.

SSC CPO Recruitment 2023
SSC CPO Recruitment 2023 : Letstalk Jobs

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये कुठेही

शुल्क :

हे वाचा: Maharashtra District Court Recruitment 2023 : महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 5 हजार 793 जागांसाठी भरती सुरु.

या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपये (₹100/-) शुल्क असणार आहे तर एससी, एसटी ExSM अशा मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना आणि महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.

SSC CPO Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पहा. 

जाहिरात (Notification) – अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा. 

ऑनलाईन अर्ज – येथे Click करा. 

परीक्षेचे नाव –

दिल्ली पोलीस आणि CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2023

SSC CPO Recruitment 2023
सरकारी नोकरी

SSC CPO Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा –

या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 15 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच परीक्षा ऑक्टोबर 2023 मध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेबाबतची संपूर्ण माहिती नंतर कळविण्यात येणार आहे.

भरतीचे स्वरूप कसे असू शकते?

या भरती प्रक्रियेअंतर्गत दिल्ली पोलीस आणि CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2023 ही घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येऊ शकते.

या भरती प्रकियेबाबत काही अडचण आल्यास तुम्ही अधिक माहितीसाठी वरील जाहिरात पाहू शकता.

Related Articles

MUCBF Recruitment 2024
Jobs

MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

AIIA Recruitment 2024
Jobs

AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

BIS Recruitment 2024
Jobs

BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

SBI Clerk Recruitment 2023
Jobs

SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...