Government Job : पदव्युत्तर पदवी घेतलेल्या तरुणांना सरकारी नोकरी करण्याची एक मोठी संधी आहे. सरकारच्या एक विभागामध्ये महत्वाच्या पदांसाठी भरती सुरु झालेली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन अर्ज करायचा आहे. सरकारच्या कोणत्या विभागामध्ये ही नोकरीची संधी उपलब्ध आहे? तसेच कोणत्या जागांसाठी भरती होणार आहे? चला तर मग जाणून घेऊयात याबाबतची संपूर्ण माहिती.
Government Job 2023 : सरकारी नोकरी करण्याची संधी
भारत सरकारच्या (Government of India) ‘पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सचे कंट्रोलर जनरल (Controller General of Patents, Designs, and Trade Marks Recruitment 2023) अंतर्गत महत्वाच्या 500 हुन अधिक जागांवरती भरती होणार आहे. ह्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला देखील सुरुवात झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? वयोमर्यादा काय आहे? परीक्षा कधी असणार? सर्वात महत्वाचं ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घेऊयात याबाबतची संपूर्ण माहिती.
हे वाचा: SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.
Government Job 2023 : जाणून घ्या अर्ज प्रक्रिया :
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव : पेटंट आणि डिझाईन परीक्षक (ग्रुप-A)
एकूण पदसंख्या : 553 जागा
हे वाचा: Government Job : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 जागांसाठी भरती होणार.
Government Job 2023 : शैक्षणिक पात्रता काय आहे?
खालीलपैकी कोणत्याही एका शाखेमध्ये पदव्युत्तर पदवी आवश्यक
- बायो-टेक्नोलॉजी
- बायो-केमिस्ट्री
- केमिस्ट्री
- पॉलोमर सायन्स
- कॉम्प्युटर सायन्स
- IT
- फिजिक्स
किंवा याव्यतिरिक्त खालीलपैकी कोणत्याही एका शाखेमध्ये पदवी आवश्यक
- फूड टेक्नोलॉजी
- बायो-मेडिकल इंजिनिअरिंग
- इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन
- इलेक्ट्रिकल
- कॉम्प्युटर सायन्स
- सिव्हिल
- मेकॅनिकल
- मेटलर्जी टेक्सटाईल इंजिनिअरिंग किंवा समतुल्य
वयोमर्यादा –
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 04 ऑगस्ट 2023 पर्यंत सरासरी 21 ते 35 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये मागासवर्गीयांना म्हणजेच SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षांची सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षांची सूट असणार आहे.
शुल्क :
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल, ओबीसी आणि ईडब्लूएस या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये (₹1000/-) शुल्क असणार आहे तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना आणि महिलांना पाचशे रुपये (₹500/-) शुल्क असणार आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये कुठेही.
Government Job 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पहा.
जाहिरात (Notification) – अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
ऑनलाईन अर्ज – येथे Click करा.
महत्वाच्या तारखा –
या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 04 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
परीक्षा कधी होणार?
- पूर्व परीक्षा : 03 सप्टेंबर 2023
- मुख्य परीक्षा : 01 ऑक्टोबर 2023
भरतीचे स्वरूप :
या भरती प्रक्रियेअंतर्गत सर्वात आधी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येऊ शकते.
या भरती प्रकियेबाबत काही अडचण आल्यास तुम्ही अधिक माहितीसाठी वरील जाहिरात पाहू शकता.