SSC Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची एक मोठी संधी आहे. कारण स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत MTS आणि हवालदार पदांच्या तब्बल 1 हजार 558 जागांसाठी भरती सुरु झालेली आहे. एसएससीने या भरती बाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये दहावी पास असणाऱ्या युवकांना देखील अर्ज करता येणार आहे. त्यामुळे तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती.
SSC Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती सुरु
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत जवळपास दीड हजाराहून अधिक जागांसाठी भरती सुरु झालेली आहे. तसेच ह्या भरतीसाठी ऑनलाईन अर्जप्रक्रिया देखील सुरु झालेली आहे. इच्छुक उमेदवार खालील माहितीच्या आधारे ऑनलाईन अर्ज करू शकतात.
हे वाचा: RBI Recruitment : RBI Assistant ह्या पदासाठी भरती
SSC Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया
पदांचा संपूर्ण तपशील
1) मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ) : 1 हजार 198 जागा
2) हवालदार : 360 जागा
एकूण पदसंख्या : 1 हजार 558 जागा.
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
वयोमर्यादा :
हे वाचा: Maharashtra Metro Recruitment 2023 : महाराष्ट्र मेट्रो रेल्वेत भरती सुरु; अर्ज कसा करायचा? पाहा
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 01 ऑगस्ट 2023 पर्यंत सरासरी 18 ते 27 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांना वयात 3 ते 5 वर्षे सूट असणार आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये कुठेही
शुल्क :
खुल्या आणि OBC प्रवर्गासाठी 100 रुपये शुल्क असणार आहे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि महिलांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.
SSC Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पहा
जाहिरात (Notification) – अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
ऑनलाईन अर्ज – येथे Click करा.
महत्वाच्या तारखा
या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 21 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच परीक्षा सप्टेंबर 2023 या कालावधी दरम्यान होणार आहे.
या भरती प्रकियेबाबत काही अडचण आल्यास तुम्ही अधिक माहितीसाठी वरील जाहिरात पाहू शकता.