पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ही एक परवडणारी मुदत विमा योजना असून याअंतर्गत अवघ्या 436 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर 2 लाखांचे विमा संरक्षण मिळते. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर क्लेमची रक्कम त्याच्या नातेवाईकांना किंवा नॉमिनीला (नामांकित/सदस्य) दिली जाते. चला तर, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना नेमकी काय आहे? या योजनेचा लाभ कसा घेता येतो? त्यासाठी काय पात्रता लागते? यासह सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखामध्ये समजून घेऊयात.
हे वाचा: येत्या 1 फेब्रुवारीपासून नक्की कोणते बदल होणार? समजून घ्या...
ही योजना 18 ते 50 वर्षे वयोगटातील लोकांसाठी आहे. ज्या लोकांचे बॅंकेत खाते आहे, ते यात सामील होऊ शकतात. 2 लाख रुपयांची जीवन सुरक्षा 1 जून ते 31 मे या एक वर्षाच्या कालावधीसाठी आहे. याअंतर्गत, विमाधारक व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास जोखीम संरक्षण म्हणून 2 लाख रुपये आहे.
प्रीमियमची वार्षिक रक्कम 436 रुपये ग्राहकांच्या बँक खात्यातून एका हप्त्यात 31 मे रोजी किंवा त्यापूर्वी स्वयं-डेबिट केली जाते. ही योजना लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि इतर सर्व लाइफ इन्शुरन्सद्वारे ऑफर केली जात आहे.
जर तुम्ही इच्छुक असाला तर तुम्ही हा प्लॅन एलआयसीमार्फत घेऊ शकता. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत देखील याबद्दलची माहिती घेऊ शकता. क्लेम मिळविण्यासाठी तुम्हाला त्या विमा कंपनीकडे किंवा जिथून विमा काढला आहे, त्या बँकेकडे जाऊन क्लेम करावा लागेल. मात्र त्यासाठी मृत्यू प्रमाणपत्रासोबत इतर आवश्यक कागदपत्रेही जोडावी लागतील. हा टर्म इन्शुरन्स असल्याने, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरच यामध्ये कव्हरेजचा लाभ मिळतो. मुदत संपल्यानंतरही तो ठीक राहिल्यास योजनेंतर्गत कोणताही लाभ दिला जात नाही. तसेच इतर काही स्थिती आहेत, ज्यात व्यक्तीला योजनेचा लाभ मिळणार नाही. त्या अटींबाबत देखील एकदा समजून घ्या.
हे वाचा: इन्शुरन्सचा हप्ता कसा कमी करायचा? जाणून घ्या सोपे मार्ग
या योजनेअंतर्गत EWS आणि BPL सह जवळजवळ सर्व उत्पन्न गटातील सर्व नागरिकांसाठी प्रीमियमचा आर्थिक दर उपलब्ध आहे. याअंतर्गत विमा संरक्षण त्याच वर्षी 1 जूनपासून सुरू होईल आणि पुढील वर्षांच्या 31 मे पर्यंत असणार आहे. यामध्ये विमा खरेदी करण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही.
एलआयसी/विमा कंपनीला विमा प्रीमियम : 389 रुपये, बीसी/मायक्रो/कॉर्पोरेट/एजंटसाठी खर्चाची प्रतिपूर्ती : 30 रुपये, सहभागी बँकेच्या प्रशासकीय शुल्काची परतफेड : 17 रुपये, एकूण प्रीमियम : 436 रुपये.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता अटी तपासून अर्ज करा. या योजनेअंतर्गत जर तुम्ही आधीच नोंदणी केली असेल तर तुम्हाला दरवर्षी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. यातून दरवर्षी तुमच्या बँक खात्यातून प्रीमियमची रक्कम कापली जाईल. तुमचे नूतनीकरण केले जाईल. नावनोंदणीच्या पहिल्या 45 दिवसांपर्यंत सर्व नवीन खरेदीदार या योजनेअंतर्गत क्लेम करू शकत नाहीत. 45 दिवस पूर्ण झाल्यानंतरच क्लेम करता येतो. मात्र जर अर्जदाराचा मृत्यू अपघातामुळे झाला असेल तर या प्रकरणात अर्जदाराच्या कुटुंबीयांना रक्कम दिली जाते.
हे वाचा: LIC Policy : एलआयसी पॉलिसी बंद करायचीय? अगोदर 2 नियम माहित करुन घ्या.