Thursday , 16 January 2025
Home घडामोडी 19th Asian Games Hangzhou : अहमदनगरचा आदित्य आशियाई स्पर्धेत ‘या’ क्रीडाप्रकारात खेळणार.
घडामोडी

19th Asian Games Hangzhou : अहमदनगरचा आदित्य आशियाई स्पर्धेत ‘या’ क्रीडाप्रकारात खेळणार.

19th Asian Games Hangzhou
19th Asian Games Hangzhou

19th Asian Games Hangzhou : चीनमध्ये हँग जुई इथं सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी अहमदनगरच्या आदित्य संजय धोपावकर याची भारतीय कुराश संघात निवड झाली आहे. आशियाई स्पर्धेत सहभागी होणारा तो अहमदनगरचा वैयक्तिक खेळातील एकमेव खेळाडू आहे.

19th Asian Games Hangzhou

हे वाचा: One Nation One Document : काय असेल हा नवीन कायदा?

19th Asian Games Hangzhou : आदित्य आशियाई स्पर्धेत खेळणार.

हाँगजुई इथं 23 सप्टेंबरपासून आशियाई स्पर्धा सुरू झाल्या आहेत. भारताने 45 क्रीडा प्रकारात 600 खेळाडूंनी भाग घेतला आहे. कुराश या खेळाचा या स्पर्धेत समावेश आहे.

हेही वाचा : How IPL Generate Revenue : आयपीएलचे अर्थशास्त्र.

आदित्य हा 81 किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्यासह भारतीय संघात तीन मुलं, तीन मुलींचा समावेश आहे. दिल्ली व भोपाळ येथे झालेल्या दोन निवड चाचणीमधून आदित्यची निवड झाली आह़े.

हे वाचा: State Cabinet Meeting Decision : आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत लोकाभिमुख निर्णय.

19th Asian Games Hangzhou

19th Asian Games Hangzhou : उद्या होणार सामना

आदित्य हा 2012 पासून यंग मेन्स असोसिएशनच्या सिद्धीबाग ज्यूदो हॉलमध्ये कुराश व ज्युदोचा सराव करतो. त्याला राष्ट्रीय कीर्तीचे क्रीडा मार्गदर्शक त्याचे वडील प्रा. संजय धोपावकर यांचे मार्गदर्शन लाभले. आदित्य हा चीनला 27 सप्टेंबरला रवाना झाला असून त्याची स्पर्धा 1 ऑक्टोबरला हाेणार आहे.

हे वाचा: Maratha Reservation : मनोज जरांगेची तब्येत बिघडली