1 मार्चपासून नक्की कोणते 5 नियम बदलणार? जाणून घ्या सविस्तर…
फेब्रुवारी महिना संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत. बदलणाऱ्या या महिन्यासह अनेक नवीन नियम लागू होणार आहेत. यातील काही नियमांचा तुमच्या खर्चाच्या योजनेवर देखील परिणाम होऊ शकतो. येत्या 1 मार्चपासून सोशल मीडिया, बँक कर्ज, एलपीजी सिलिंडर आणि इतर गोष्टींबाबत बदलाची शक्यता आहे. नक्की कोणते नवीन नियम लागू होतील? तुमच्या मासिक खर्चावर कसा परिणाम करू होऊ शकतो? सविस्तर जाणून घेऊयात…
हे वाचा: फेब्रुवारीत किती दिवस बँका बंद राहतील? सुट्ट्यांची यादी तपासा..
- बँक कर्ज : रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी त्यांचे MCLR दर वाढवले आहेत. या सर्वांचा थेट परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होणार आहे. तर ईएमआयचा बोजा आणि कर्जाचे वाढते व्याजदर यामुळे सर्वसामान्यांना त्रास होणार आहे, एवढं नक्की.
- एलपीजी आणि सीएनजी दर : या गॅसचे दर प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला निश्चित होत असतात. गेल्या वेळी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली नसली तरी यंदा सणासुदीच्या निमित्ताने दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
- रेल्वे वेळापत्रक : उन्हाळा जवळ येऊन ठेपल्याने भारतीय रेल्वे ट्रेनच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये ही यादी जाहीर केली जाऊ शकते. माहितीनुसार, 1 मार्चपासून 5 हजार मालगाड्या आणि हजारो प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक बदलले जाऊ शकते.
- बँक सुट्टी : येत्या मार्च महिन्यामध्ये होळी आणि नवरात्रीसह एकूणम 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये बँकांच्या साप्ताहिक सुट्ट्यांचा देखील समावेश आहे.
- सोशल मीडिया अटी आणि नियम : सरकारने अलीकडेच आयटी नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. आता ट्विटर, फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईट्सना नवीन भारतीय नियमांचे पालन करावे लागत आहे. धार्मिक भावना भडकावणाऱ्या पोस्टसाठी नवीन धोरण प्रभावी ठरणार आहे. हे नवीन नियम मार्चमध्ये लागू होऊ शकतात. अशात चुकीच्या पोस्टमुळे वापरकर्त्यांना दंड देखील होऊ शकतो.