Thursday , 16 January 2025
Home घडामोडी Update on Diesel Vehicle – डिझेल गाड्या आता महागणार
घडामोडी

Update on Diesel Vehicle – डिझेल गाड्या आता महागणार

Update on Diesel Vehicle

डिझेल कार घेणे होणार महाग, 10 टक्के जीएसटी लागू होणार?

Update on Diesel Vehicle : डिझेल गाड्या आता महागणार.

पूर्वी चार चाकी घेताना पेट्रोल की डिझेल असा अनेकांना प्रश्न पडायचा आणि जास्त वापर असेल तर डिझेलची गाडी घ्या असा सल्लाही मिळायचा. कारण डिझेल तेंव्हा स्वस्त होतं. पेट्रोल कायमच भाव खाणारे होते.

हळूहळू पेट्रोलसोबतच डिझेलचीही किंमत वाढली आणि जवळपास दोन्हीही सारख्याच लेव्हलला किमती पोहोचल्या. कमर्शिअल व्हेहिकल्स ह्या डिझेलवरच चालतात.

हे वाचा: Aurangabad & Usmanabad Names Changed : सरकारतर्फे राजपत्र जारी

परंतु पर्यावरणीय दृष्टिकोनातून डिझेल गाड्या ह्या जास्त प्रदूषण करणाऱ्या आणि प्रदूषणाला धोका पोहोचवणाऱ्या ठरल्या आहेत. म्हणून सगळ्याच सरकारांनी डिझेल गाड्यावर काही प्रमाणात बंदी आणि त्यांचा वापर कमी करण्याची प्रक्रिया सुरु केलेली होती.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ह्यांनी बऱ्याच काळापासून डिझेल उत्पादकांना डिझेल इंजिनचे उत्पादन आणि विक्री कमी करण्याचे आवाहन केलेले. तसेच मे २०२३च्या सुरुवातीला, ऊर्जा परिवर्तन सल्लागार समितीने सुचवले होते की भारताने 2027 पर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांवर बंदी घालावी.

ह्याच सगळ्या घडामोडीवर विचार करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी डिझेल वाहनांसंदर्भात एक मोठा निर्णय केंद्राने घ्यावा ह्यासाठी प्रसव ठेवत आहेत. डिझेल इंजिन वाहनांवर अतिरिक्त 10 टक्के कर लावण्याचा प्रस्ताव ठेवण्याची ही नवीन योजना आहे. नितीन गडकरी ह्यांच्या म्हणण्यानुसार हा प्रस्ताव अर्थमंत्र्यांकडे पाठवणार जाईल आणि नन्तर मान्यता घेऊन त्यावर अमलबजावणी केली जाईल.

हे वाचा: RBI Nagar Urban Bank : RBI कडून नगर अर्बन बॅंकेचा परवाना रद्द