TATA WPL 2023 : भारतीय महिला क्रिकेटने कात टाकल्यास सुरुवात केली आहे. आजपासून वुमेन्स आयपीएलला म्हणजेच वुमेन्स प्रिमिअर लीगच्या (TATA WPL 2023) पहिल्या सिझनला सुरवात होत असून आयपीएल (IPL) प्रमाणेच ही स्पर्धा होणार आहे. वूमेन्स आयपीएलच्या (TATA WPL 2023) पहिल्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्स (MI), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB), दिल्ली कॅपिटल्स (DC), गुजरात जायंट्स (GG), यूपी वॉरियर्स (UPW) या पाच संघांचा समावेश आहे. तसेच WPL चे सर्व सामने मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियम आणि नवी मुंबईमधील डी वाय पाटील स्टेडियमवरती खेळवले जाणार आहे.
ग्रँड ओपनिंग होणार –
वूमेन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्याआधी स्पर्धेचं ग्रँड ओपनिंग होणार आहे. पहिला सामना सुरु होण्याच्या अवघ्या दोन तास आधी हा उद्घाटन सोहळा सुरु होणार आहे.. या सोहळ्यात एपी ढिल्लो बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.
हे वाचा: तुम्हाला SUV, XUV, MUV आणि TUV चे फुल फॉर्म माहित आहे का? जाणून घ्या...
पहिली लढत मुंबई विरुद्ध गुजरात –
वुमेन्स प्रिमिअर लीगचा श्रीगणेशा हा मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स या सामन्याने होणार आहे. हा सनम नवी मुंबईच्या डी वाय पाटील या स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजल्यासून होणार आहे.
सामने कधी आणि कुठे पाहता येणार?
वुमेन्स प्रिमिअर लीगच्या सर्व सामान्यांचं थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर होणार आहे तसेच सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग Jio Cinema या अॅपवरून आणि वेबसाइटवरून पाहता येणार आहे.
हे वाचा: The Unorthodox Solution to the World’s Migration Woes
अवघ्या 100 रुपयांमध्ये तिकिट –
जास्तीत जास्त प्रेक्षसकांनी वुमेन्स प्रिमिअर लीगचे सामने स्टेडियम मध्ये जाऊन पाहावेत यासाठी बीसीसीआयने सामन्याच्या तिकिटांचे दर फक्त 100 रुपये इतकी ठेवली आहे. Book My Show या वेबसाईटवर किंवा अँपवर जाऊन तुम्ही तिकीट बुक करू शकता.
पहा सामान्यांचं संपूर्ण वेळापत्रक –
- 4 मार्च 2023 : गुजरात विरुद्ध मुंबई (संध्याकाळी 7:30 वाजता)
- 5 मार्च 2023 : बंगळुरु विरुद्ध दिल्ली (दुपारी 3:30 वाजता)
- 5 मार्च 2023 : यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात (संध्याकाळी 7:30 वाजता)
- 6 मार्च 2023 : मुंबई विरुद्ध बंगळुरु (संध्याकाळी 7:30 वाजता)
- 7 मार्च 2023 : दिल्ली विरुद्ध यूपी वॉरियर्स (संध्याकाळी 7:30 वाजता)
- 8 मार्च 2023 : गुजरात विरुद्ध बंगळुरु (संध्याकाळी 7:30 वाजता)
- 9 मार्च 2023 : दिल्ली विरुद्ध मुंबई (संध्याकाळी 7:30 वाजता)
- 10 मार्च 2023 : बंगळुरु विरुद्ध यूपी वॉरियर्स (संध्याकाळी 7:30 वाजता)
- 11 मार्च 2023 : गुजरात विरुद्ध दिल्ली (संध्याकाळी 7:30 वाजता)
- 12 मार्च 2023 : यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई (संध्याकाळी 7:30 वाजता)
- 13 मार्च 2023 : दिल्ली विरुद्ध बंगलोर (संध्याकाळी 7:30 वाजता)
- 14 मार्च 2023 : मुंबई विरुद्ध गुजरात (संध्याकाळी 7:30 वाजता)
- 15 मार्च 2023 : यूपी वॉरियर्स विरुद्ध बंगळुरु (संध्याकाळी 7:30 वाजता)
- 16 मार्च 2023 : दिल्ली विरुद्ध गुजरात (संध्याकाळी 7:30 वाजता)
- 18 मार्च 2023 : मुंबई विरुद्ध यूपी वॉरियर्स (दुपारी 3:30 वाजता)
- 18 मार्च 2023 : बंगळुरु विरुद्ध गुजरात (संध्याकाळी 7:30 वाजता)
- 20 मार्च 2023 : गुजरात विरुद्ध यूपी वॉरियर्स (दुपारी 3.30 वाजता)
- 20 मार्च 2023 : मुंबई विरुद्ध दिल्ली (संध्याकाळी 7:30 वाजता)
- 21 मार्च 2023 : बंगळुरु विरुद्ध मुंबई (दुपारी 3:30 वाजता)
- 21 मार्च 2023 : यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली (संध्याकाळी 7:30 वाजता)
- 24 मार्च 2023 : एलिमिनेटर (संध्याकाळी 7:30 वाजता)
- 26 मार्च 2023 : फायनल (संध्याकाळी 7:30 वाजता, ब्रेबॉर्न स्टेडियम)