SSC JE Recruitment 2023 : इंजिनिअरची पदवी प्राप्त असणाऱ्या तरुणांना सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिश अंतर्गत भारत सरकारच्या विविध कार्यालयामध्ये ज्युनिअर इंजिनिअर्सची भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत ज्युनिअर इंजिनिअर्सच्या एक हजाराहून अधिक जागा भरण्यात येणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती प्रक्रिया कशाप्रकारे राबविण्यात येणार आहे? जाणून घेऊयात संपूर्ण माहिती.
SSC JE Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनिअर इंजिनिअर्स पदांसाठी भरती सुरु
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनिअर इंजिनिअर्स पदांसाठी भरती सुरु झालेली आहे. ह्यामध्ये वेगवेगळ्या पदांच्या तब्बल 1 हजार 324 जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणारी ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल,मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल) परीक्षा 2023 द्यावी लागणार आहे. त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरु होणार आहे. तथापि या परीक्षेमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागणार आहे. आता हा ऑनलाईन अर्ज कसा करायचा? ह्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? जाणून घेऊयात या भरती बाबतची सविस्तर माहिती.
हे वाचा: Bank Note Press Recruitment 2023 : सरकारी नोकरी करण्याची संधी - बँक नोट मुद्रणालयात भरती सुरु
SSC JE Recruitment 2023 : जाणून घेण्यात संपूर्ण अर्जप्रक्रिया
पदांचा संपूर्ण तपशील पुढील प्रमाणे
पदाचे नाव : एकूण पदसंख्या
1) ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल) – 1 हजार 095 जागा
2) ज्युनिअर इंजिनियर (मेकॅनिकल) – 31 जागा
3) ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) – 125 जागा
4) ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल) – 73 जागा
हे वाचा: ESIC Maharashtra Recruitment 2023 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती सुरु; असा करा अर्ज
एकूण पदसंख्या : 1 हजार 324 जागा
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी आणि डिप्लोमा.
वयोमर्यादा :
हे वाचा: Nashik Police Patil Bharti 2023 : नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांसाठी भरती सुरु
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 01 जानेवारी 2023 पर्यंत सरासरी 30 ते 32 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये मागासवर्गीयांना म्हणजेच SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षांची सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षांची सूट असणार आहे.
शुल्क :
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल आणि ओबीसी (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपये (₹100/-) शुल्क असणार आहे तर एससी (SC), एसटी (ST), पीडब्ल्यूडी (PWD) आणि ExSMअशा प्रवर्गातील उमेदवारांना तसेच महिलांना कोणत्याही प्रकारचे शुल्क नसणार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही
SSC JE Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पाहा.
जाहिरात (Notification) – अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
ऑनलाईन अर्ज – येथे Click करा.
SSC JE Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा –
CBT (पेपर I) : ऑक्टोबर 2023
या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 16 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच परीक्षाबाबतची संपूर्ण माहिती नंतर कळविण्यात येणार आहे.
या भरती प्रकियेबाबत काही अडचण आल्यास तुम्ही अधिक माहितीसाठी वरील जाहिरात पाहू शकता.