Smart TV : जर तुम्ही स्मार्ट टीव्ही खरेदी करायचं तुमच्या डोक्यात असेल की, भविष्यात प्लॅनिंग असेलत तर तुमच्यासाठी सध्या एक दमदार ऑफर चालून आली आहे. कारण, सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनवर फॅब टीव्ही फेस्ट सेल सुरू आहे. हा सेल सोमवारी 10 एप्रिलपर्यंत चालणार आहे. यामध्ये टॉप ब्रँड्सच्या टीव्हीवर 50 टक्के इन्स्टंट डिस्काउंटचा लाभ मिळतो आहे. याशिवाय तुम्हाला या डील्समध्ये अनेक बँक ऑफर्सचाही देखील लाभ आहे. चला, तर पाहूया कोणत्या स्मार्टटीव्हीचा ऑफरमध्ये समावेश आहे.
रेडमी 80 cm (32 inch) : या 30 इंचाच्या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 24 हजार 999 रुपये एवढी आहे. दरम्यान तुम्ही अमेझॉनवरून तुम्ही 52 टक्के डिस्काउंटसह केवळ 11 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या टीव्हीसाठी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्हाला त्यावर 10 टक्क्यांची झटपट सूट मिळेल. तर या 32-इंचाच्या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 17 हजार 400 रुपये आहे, परंतु तो 49 टक्के सूटसह 8 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. तर तुम्ही तुमच्या एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्ही 10 टक्के झटपट सवलत मिळवू शकता.
हे वाचा: If You Struggle To Hit Your Goals, Try This Instead
एमआय 80 cm (32 Inch) 5A Series : या 32-इंचाच्या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 24 हजार 999 रुपये आहे. अमेझॉनवर हा स्मार्ट टीव्ही 48 टक्के सूटसह अवघ्या 12 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या स्मार्ट टीव्हीसाठी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डने पैसे भरले तर तुम्हाला 10 टक्के तात्काळ सवलतीचा लाभ मिळेल.
एनयू 109 cm (43 inch) Premium Series : या 43-इंचाच्या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 39 हजार 999 रुपये एवढी आहे, परंतु तुम्ही अमेझॉनवरून हा टीव्ही खरेदी केल्यास तुम्हाला 50 टक्के सूट मिळेल. यामुळे हा टीव्ही तुम्ही अवघ्या 19 हजार 990 रुपयांना खरेदी करू शकता. जर तुम्ही या स्मार्ट टीव्हीसाठी एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्हाला 750 रुपयांच्या झटपट सूटचाही लाभ मिळेल.
कोडॅक 98 cm (40 in) : या 40-इंचाच्या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 24 हजार 99 रुपये आहे परंतु 40 टक्के सूटसह हा टीव्ही अवघ्या 14 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तुम्ही या स्मार्ट टीव्हीसाठी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्ही 10 टक्के तात्काळ सवलतीचा लाभ घेऊ शकता.
हे वाचा: Debt Market : गुंतवणुकीची संधी शोधताय? डेट मार्केटबद्दल वाचून तुमचा शोध संपेल..