Recharge plan : जवळपास सर्व दूरसंचार कंपन्या त्यांच्या ग्राहकांच्या सोयीसाठी बेस्ट रिचार्ज प्लॅनच्या ऑफर सादर करत असतात. जर तुम्ही टेलिकॉम कंपनी जिओ, एअरटेल आणि वोडाफोन (वीआय) चे ग्राहक असाल आणि तुम्ही 300 रुपयांपेक्षा कमी रिचार्ज प्लॅनच्या शोधत असाल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा…
एअरटेल : या कंपनीच्या रिचार्ज प्लॅनची किंमत 296 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 25 जीबी 4G हायस्पीड डेटा दिला जात आहे. यामध्ये तुमच्याकडे कोणतीही दैनिक डेटा मर्यादा नाही. तुम्ही हा सर्व डेटा एकाच वेळी वापरू शकता किंवा तुम्ही ते हळू-हळू करू शकता. यासोबतच या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळत आहे. यासोबतच दररोज 100 एसएमएसही मोफत दिले जात आहेत. या प्लॅनची वैधता 30 दिवसांसाठी आहे.
हे वाचा: Recovery and Cleanup in Florida After Hurricane Ian
जिओ : या कंपनीच्या प्लॅनची किंमत 299 रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना 25 जीबी डेटा दिला जात आहे. यामध्ये कोणतीही दैनिक डेटा मर्यादा नाही, याचा अर्थ असा की तुम्ही हा डेटा एका दिवसात वापरू शकता किंवा महिन्याभरात हळू-हळू वापर करू शकता. या रिचार्ज प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. यामध्ये दररोज 100 एसएमएस मोफत मिळतात, तसेच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ मिळतो.
Vi: या कंपनीच्या प्लॅनची किंमत 296 रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. यासोबतच 25 जीबी हायस्पीड डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता 30 दिवस आहे, ज्यामध्ये दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. सोबतच इतर फायदे देखील मिळतात.