PM Vishwakarma Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी केंद्र सरकारने विश्वकर्मा योजना लाँच केली. समाजातील कौशल्यावर आधारित काम करणाऱ्या लोकांसाठी ही योजना केंद्राने लाँच केलेली आहे. स्वातंत्र्यदिनी घोषणा झालेली ही योजना कालच्या दिवशी प्रत्यक्षात आली.
13,000 कोटी रुपयांची ही एक नवीन योजना आहे आणि ती पूर्णपणे केंद्र सरकारद्वारे अर्थसहाय्यित आहे. विश्वकर्मा जयंतीनिमित्त सुमारे 13,000-15,000 कोटी रुपये केंद्र देणार आहे, जे लोक पारंपारिक कौशल्यासहित स्वतःच्या हातांनी काम करतात. आमचे सुतारकाम करणारे असोत किंवा आमचे सोनारकाम असोत, बांधकाम करणारे आमचे गवंडी असोत किंवा आमचे लाँड्री कामगार असोत ह्या सर्वांसाठी ही योजना असेल.
हे वाचा: Free Gas Connection : मोफत गॅस कनेक्शन - उज्ज्वला 2.0 योजना
PM Vishwakarma Yojana : खालील काम करणाऱ्या लोकांना ह्या योजनेचा फायदा घेता येऊ शकतो.
कौशल्यावर आधारित अश्या 18 विविध क्षेत्रांशी संबंधित कुटुंबांना शक्य ती सर्व प्रकारे मदत केली जाईल, असे पंतप्रधान म्हणाले.
PM Vishwakarma Yojana : समाविष्ट असलेल्या कुशल कामगार कामाची यादी :
(i) सुतार काम करणारे
(ii) बोट निर्माते म्हणजे होड्या, नाव तयार करणारे
(iii) चिलखत म्हणजे चिलखती काम करणारे
(iv) लोहार काम करणारे
(v) हॅमर आणि टूल किट मेकर म्हणजे विविध अवजारे तयार करणारे
(vi) लॉकस्मिथ म्हणजे कुलुपे आणि संबंधित विशेष कौशल्य काम करणारे
(vii) सुवर्णकार म्हणजे सुवर्ण कारागीर
(viii) कुंभार काम करणारे
(ix) शिल्पकार, दगड फोडणारे
(x) मोची (जूते/ पादत्राणे कारागीर) चांभार काम करणारे
(xi) गवंडी (राजमिस्त्री) काम करणारे
(xii) बास्केट/चटई/झाडू निर्माते/कोयर विणकर
(xiii) बाहुली आणि खेळणी बनवणारे (पारंपारिक)
(xiv) न्हावी काम करणारे
(xv) हार फुले गुच्छ तयार करणारे
(xvi) धुलाई, धोबी काम करणारे
(xvii) शिंपी काम करणारे
(xviii) फिशिंग नेट करणारे
हे वाचा: Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana : दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना
PM Vishwakarma Yojana : विश्वकर्मा योजनेतून कोणते फायदे मिळू शकतात?
ही योजना वरील क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कामगारांची कौशल्ये वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कमाईत वाढ होईल अशी मदत करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे त्यांना सहजपणे कर्ज मिळण्यास मदत करण्यासाठी आहे.
ह्या योजनेअंतर्गत, विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थी कामगारांची बायोमेट्रिक-आधारित पीएम विश्वकर्मा पोर्टल वर किंवा सामान्य सेवा केंद्रांद्वारे सदरील पोर्टलवर विनामूल्य नोंदणी केली जाईल. त्यानंतर त्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे ओळख दिली जाईल.
हे वाचा: Saral Jeevan Bima Yojana : स्वस्त आणि मस्त सरकारी विमा योजना 'सरल जीवन विमा योजना (SJBY)