MPSC News : MPSCच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) एमपीएससी परीक्षेची (MPSC Exam) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली आहे. 2025 पासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. राज्य लोकसेवा आयोगाने हा निर्णय जाहीर केल्यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला.
आयोगाने ट्विट करत दिली माहिती –
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (MPSC) ट्विट करून यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेचे वर्णनात्मक स्वरूप, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती आणि तयारीसाठी उमेदवारांना देण्यात येणारा अतिरिक्त वेळ याबाबत उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन सुधारित परीक्षा आराखडा व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत आहे. असं या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे.