LIC of India : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना चालवते. अशा पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला तीन प्रकारे फायदे मिळतात. एक म्हणजे करमाफीचा लाभ, दुसरा चांगला परतावा आणि तिसरा संपूर्ण कुटुंबासाठी विमा संरक्षण. एलआयसीकडे अशा 3 विमा पॉलिसी आहेत, ज्या खरेदी करून तुम्ही आयुष्यभर निश्चिंत राहू शकता.
ही पॉलिसी मुलापासून ते वृद्धापर्यंत गुंतवणुकीची संधी देते. यापैकी एक पॉलिसी लोकांना इतकी आवडली की, लॉन्च झाल्यानंतर काही वेळातच 50 हजारांहून अधिक लोकांनी ती खरेदी केल्याचे दिसून आले होते. एलआयसी नवीन जीवन आनंद, एलआयसी जीवन उमंग आणि चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन. या तिन्ही पॉलिसी गुंतवणूकदारांना सुरक्षिततेसह हमी परतावा देतात. त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात..
हे वाचा: business : 1 लाख रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय, लग्नाच्या हंगामात बंपर कमाई फिक्स
एलआयसी नवीन जीवन आनंद : ही एक उत्तम पॉलिसी आहे. कारण येथे तुम्हाला अनेक फायदे मिळतात. या योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे. योजनेतील परिपक्वतेचे वय 75 वर्षे आहे. यात गुंतवणूक केल्याने तुम्हाला सम अॅश्युअर्डची सुविधा देखील मिळते. यासोबतच तुम्हाला कर सवलतीचाही लाभ मिळतो. याशिवाय या योजनेत तुमच्याकडे पॉलिसी सरेंडर करण्याचा पर्यायही आहे.
एलआयसी जीवन उमंग : या पॉलिसीमध्ये चांगला परतावा मिळतो. यामध्ये अर्जाचे वय 90 दिवस ते 55 वर्षे दरम्यान असावे. यामध्ये तुम्हाला कर सवलतीचा लाभही मिळतो. ही एक एंडॉवमेंट योजना आहे. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीला सर्व पैसे मिळतात. या पॉलिसीमध्ये तुम्हाला 2 लाख रुपयांची विमा रक्कम देखील मिळते.
एलआयसी न्यू चिल्ड्रेन्स मनी-बॅक प्लॅन : ही योजना खास मुलांसाठी बनवली आहे. यामध्ये मुलांना आर्थिक सुरक्षा मिळते. यामध्ये अर्जाचे वय 0 ते 12 वर्षे दरम्यान असावे. यामध्ये तुम्ही 1 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. त्याच वेळी, या योजनेतील मॅच्युरिटीचे वय 25 वर्षांपर्यंत आहे