IPL Free on Jio Cinemas : आयपीएल 2023 थरार लवकरच सुरु होईल. यंदा टाटा आयपीएलचे स्ट्रीमिंग अधिकार मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओ सिनेमाकडे देण्यात आले आहेत. ही पहिलीच वेळ आहे की, आयपीएल चाहत्यांना जिओ सिनेमावर सर्व सामने मोफत पाहता येतील. मात्र यासाठी ग्राहकांना डेटा आवश्यक असणार आहे. रिलायन्स जिओने खासकरून आयपीएलसाठी नवीन क्रिकेट प्लॅन लाँच केलेत. आम्ही तुम्हाला जिओच्या क्रिकेट प्लॅन्स आणि अॅड-ऑन प्लॅन्सबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय आयपीएल सामने पाहण्यासाठी मदत करतील.
219 रुपयांचा प्लॅन : जिओच्या सर्वात परवडणाऱ्या क्रिकेट प्लॅनची किंमत 219 रुपये आहे. याची वैधता 14 दिवसांची आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा दिला जातो. याशिवाय 2 GB अतिरिक्त डेटा देखील उपलब्ध आहे. यामध्ये ग्राहक एकूण 44 जीबी डेटा वापरू शकतात. जिओ यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधाही मिळते. याचा अर्थ ग्राहक देशभरात अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉल करू शकतात. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात. या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊडचे सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे.
हे वाचा: Governors in Danger of Losing Their Jobs With Two Weeks
399 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. यामध्ये दररोज 3 जीबी डेटा मिळतो. याशिवाय, यामध्ये 6 जीबी डेटाचा लाभ देखील घेता येईल म्हणजेच ग्राहक एकूण 90 जीबी डेटा वापरू शकतात. या रिचार्जमध्ये अमर्यादित लोकल, एसटीडी कॉल्स उपलब्ध आहेत. रिलायन्स जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये ग्राहक जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊडचा लाभ घेऊ शकतात. 5G ग्राहक या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा देखील वापरू शकतात.
999 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. यामध्ये दररोज 3 जीबी डेटा मिळतो. याशिवाय कंपनी यामध्ये 40 जीबी डेटा फ्री देत आहे. याचा अर्थ ग्राहकांना एकूण 292 GB डेटा मिळू शकतो. या प्लॅनमध्ये तुम्ही अमर्यादित लोकल, एसटीडी आणि व्हॉईस कॉल करू शकता. या रिचार्जमध्ये वापरकर्त्यांना दररोज एकूण 100 एसएमएस ऑफर केले जातात. जिओ ग्राहकांना या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊडचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. तुम्ही 5G वापरत असाल, तर तुम्ही यामध्ये अमर्यादित 5G डेटाचा लाभ देखील घेऊ शकता.
डेटा अॅड-ऑन क्रिकेट प्लॅन : या प्लॅनची किंमत 667 रुपये तर वैधता 90 दिवसांची आहे. यामध्ये 150 GB डेटा देण्यात आला आहे. यामध्ये उपलब्ध इंटरनेट संपल्यानंतर, स्पीड 64Kbps पर्यंत कमी होतो.
हे वाचा: World Book and Copyright Day : जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन.
444 रुपयांच्या डेटा अॅड-ऑन प्लॅनची वैधता 60 दिवसांची आहे. यामध्ये ग्राहकांना एकूण 100 GB डेटा देण्यात आला आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा संपल्यानंतर, स्पीड 64Kbps पर्यंत कमी होतो.
222 रुपयांचा जिओ डेटा अॅड-ऑन प्लॅन वापरकर्त्याच्या विद्यमान प्रीपेड प्लॅनच्या वैधतेसह कार्य करतो. यामध्ये ग्राहकांना एकूण 50 जीबी डेटा देण्यात आला आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा संपल्यानंतर, स्पीड 50Kbps पर्यंत कमी होतो.
296 रुपयांचा जिओ फ्रीडम प्लॅन : जिओच्या 296 रुपयांच्या फ्रीडम प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. यामध्ये एकूण 25 जीबी डेटा उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे या प्लॅनमध्ये डेटा वापरण्यासाठी कोणतीही दैनिक मर्यादा नाही आणि वापरकर्ते संपूर्ण डेटा एका दिवसात वापरू शकतात. हा प्लॅन अमर्यादित व्हॉइस कॉल्स आणि दररोज 100 एसएमएस ऑफर करतो. जिओच्या या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊडचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.