Friday , 26 April 2024
Home Jobs Government Job 2023 : भारत सरकार ‘या’ कंपनीमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.
Jobs

Government Job 2023 : भारत सरकार ‘या’ कंपनीमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

Government Job 2023
Government Job 2023 : Letstalk

Government Job 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या मिंट म्हणजेच “सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड” मध्ये भरती सुरु झाली आहे. ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक आणि जूनियर बुलियन सहाय्यक ही महत्वाचे पदे भरली जाणार आहे. त्यामुळे कौशल्यवान तरुणांसाठी ही महत्वाची संधी ठरणार आहे.

Government Job 2023
Government Job 2023 : Letstalk

Government Job 2023 : भारत सरकारच्या कंपनी मध्ये भरती सुरु.

भारत सरकार मिंट, मुंबई या युनिट मार्फत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रसिद्ध केलेल्या या जाहिरातीनुसार या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध पदांच्या एकूण 65 जागा भरल्या जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता देखील पदांनुसार वेगवेगळी असणार असून शक्यतो ITI पास असणाऱ्या युवकांना यामध्ये संधी मिळू शकते.

हे वाचा: Bank of Maharashtra Recruitment 2023 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मोठी भरती सुरु; How to apply?

भरती बाबतची सविस्तर माहिती….

मिंटने प्रसिद्ध केलेल्या या जाहिरातीनुसार या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. तर या भरतीमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठं करायचा? पात्रता काय? याबातची सर्व माहिती जाणून घेऊयात….

Government Job : पदाचे नाव आणि पदसंख्या –

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा

हे वाचा: Central Bank of India Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती सुरु; असा करा अर्ज.

(15 जुलै 2023 पर्यंत)

पद संख्या
1 ज्युनियर टेक्निशियन (फिटर)  ITI (फिटर) 25 वर्षांपर्यंत 24
2 ज्युनियर टेक्निशियन (टर्नर)  ITI (टर्नर) 25 वर्षांपर्यंत 04
3 ज्युनियर टेक्निशियन (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट)  ITI (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट) 25 वर्षांपर्यंत 11
4 ज्युनियर टेक्निशियन (मोल्डर)  ITI (मोल्डिंग) 25 वर्षांपर्यंत 03
5 ज्युनियर टेक्निशियन (हीट ट्रीटमेंट)  ITI (हीट ट्रीटमेंट) 25 वर्षांपर्यंत 02
6 ज्युनियर टेक्निशियन (फाऊंड्रीमन/फर्नेसमन)  ITI (फाऊंड्री/फर्नेस) 25 वर्षांपर्यंत 10
7 ज्युनियर टेक्निशियन (ब्लॅकस्मिथ)  ITI (ब्लॅकस्मिथ) 25 वर्षांपर्यंत 01
8 ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर)  ITI (वेल्डिंग) 25 वर्षांपर्यंत 01
9 ज्युनियर टेक्निशियन (कारपेंटर)  ITI (कारपेंटर) 01
10 ज्युनियर ऑफिस असिस्टंट  1) 55% गुणांसह पदवीधर

2) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

28 वर्षांपर्यंत 06
11 ज्युनियर बुलियन असिस्टंट  1) 55% गुणांसह पदवीधर

2) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

28 वर्षांपर्यंत 02
एकूण जागा – 65

वयोमर्यादा :

हे वाचा: AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

वयाची अट ही पदनानुसार वेगवेगळी असणार आहे. तसेच या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 15 जुलै 2023 पर्यंत सरासरी 18 ते 25 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तर SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षांची सूट असणार आहे. तरीही वयाच्या संपूर्ण माहितीसाठी कृपया एकदा जाहिरात पहा. तसेच वरच्या तक्त्यातील माहिती पहा.

नोकरी ठिकाण : मुंबई

शुल्क :

खुला प्रवर्ग, OBC आणि EWS या कॅटेगरीमध्ये असणाऱ्या उमेदवारांना 600 रुपये शुल्क असणार आहे. तर SC, ST आणि PWD या प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये शुल्क असणार आहे.

Government Job 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पहा 

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

ऑनलाईन अर्ज – येथे Click करा. 

Government Job 2023 : महत्वाच्या तारखा

भारत सरकारच्या या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 15 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर आज पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा कधी होणार? याबाबतची संबंधित विभागाकडून नंतर कळविण्यात येणार आहे.

तुम्हाला या भरती बाबतची सविस्तर माहितीसाठी तुम्ही वर दिलेली जाहिरात पाहू शकता.







Subscribe Now

    Subscribe to our mailing list to receives daily updates direct to your inbox!

    Related Articles

    MUCBF Recruitment 2024
    Jobs

    MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

    MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

    AIIA Recruitment 2024
    Jobs

    AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

    AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

    BIS Recruitment 2024
    Jobs

    BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

    BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

    SBI Clerk Recruitment 2023
    Jobs

    SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

    SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...