Free Gas Connection : आता गॅस कनेक्शन पण मिळणार मोफत. उज्ज्वला 2.0 योजना
आता महिलांना एलपीजी (LPG) कनेक्शन देण्यासाठी अनुदान जारी होणार. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत नवीन एलपीजी कनेक्शनला अनुदान देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
आता ह्या उज्ज्वला 2.0 योजने अंतर्गत 75 लाख नवीन एलपीजी कनेक्शन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
एकूण 1,650कोटी रुपयांचे अनुदान ह्या कामासाठी मंजूर करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ह्यांनी असे सांगितले की ‘पुढील तीन वर्षांत, 2026 पर्यंत 75 लाख मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात येतील’.
कोण घेऊ शकतो उज्ज्वला योजना 2.0 चा फायदा ?
- – प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) वेबसाइटनुसार, ज्यांच्या घरात LPG कनेक्शन नाही अश्या गरीब कुटुंबातील प्रौढ महिला ह्या नव्या योजनेअंतर्गत पात्र मानली जाईल.
- – सामाजिक-आर्थिक आणि जात जनगणना २०११ अंतर्गत ज्या महिला समाविष्ट आहेत त्यांना ह्यासाठी पात्र समजले जाईल.
- – अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीचे लोक, प्रधानमंत्री आवास योजना, अंत्योदय अन्न योजना, वनवासी, मागासवर्गीय, चहाच्या बागेतील पूर्वीच्या जमाती, नदी बेटांवर राहणारे लोक ह्यातली जी मंडळी लाभार्थी आवश्यक सहाय्यक कागदपत्रे सादर करतील त्यांना कनेक्शन मोफत दिले जाईल.
- – ह्याव्यतिरिक्त एखादी महिला वरील कोणत्याच श्रेणींत बसू शकत नसेल, तर ती गरीब कुटुंबांतर्गत लाभार्थी असल्याचा दावा करून गॅस कनेक्शन मोफत मिळवू शकते.